suicide esakal
जळगाव

Jalgaon Crime News : धानवडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : धानवड (ता.जळगाव) येथील ५५ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

जिल्‍हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. शिवाजी चिंधा पाटील (वय-५५ वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.(farmer suicide due to loan jalgaon crime news)

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील पत्नी, दोन मुलं आणि नातू यांच्यासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी (ता.१९) पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

चिठ्ठीतील मजकूर गंभीर

आत्महत्येपूर्वी त्यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती. त्यात ‘कर्जबाजारीपणाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे’ असे नमूद केले होते. याच शेतकर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. शिवाजी पाटील यांचा मुलगा गोपाळ आणि पत्नी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच आक्रोश केला.

घरातील आक्रोश पाहता शेजाऱ्यांसह नातेवाईकांनी मदतीला धाव घेत त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

शिवाजी पाटील यांनी गळफास घेतल्याचे कळाल्यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुटूंबीय, नातेवाईकांसक धानवड ग्रामस्थांनी गर्दी होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

एकीकडे अर्ज दुसरीकडे दुखणं

शिवाजी पाटील यांना बऱ्याच दिवसांपासून आजारपणामुळे अस्वस्थ वाटत होतं. शेतीची नापिकी, त्यातून कर्जबाजारीपणा आणि आजारपणाचे उपचार अशा दुहेरी विवंचनेत असताना कंटाळून शिवाजी पाटलांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाईड नोटवरुन समजत, असे पोलिसांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT