Girish Mahajan esakal
जळगाव

Girish Mahajan : जळगावात सिमेंटच्या गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे ‘नेटवर्क’ : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासाठी सिमेंटच्या रस्त्यांसाठी शंभर कोटींचे ‘गिफ्ट’ देताना ही कामे राज्यातील लौकिकप्राप्त मक्तेदाराकडून अत्यंत गुणवत्तापूर्ण करून घेऊ. (Girish Mahajan statement about quality road construction work by funding in jalgaon news)

जळगाववासियांना रस्त्यांच्या बाबतीत पुढची २५ वर्षे चिंता नसेल, असे रस्त्यांचे नेटवर्क उभारण्यात येईल, असा विश्‍वास राज्याचे ग्रामीण विकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केला.

भाजपच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला महाजन व आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने जळगाव शहरात कॉंक्रिटच्या रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी १०० कोटींचे ‘गिफ्ट’ दिले. त्यासंदर्भात महाजनांशी संपर्क केला असता त्यांनी या रस्त्यांच्या प्रस्तावित कामांबाबत ‘सकाळ’ कडे आपले व्हीजन मांडले.

गुणवत्तापूर्ण कामावर भर

आता कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील सिमेंटच्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्याआधी राजूमामांनी ८० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या निधीतून आपण जळगावातील रस्त्यांची सर्व कामे कॉंक्रिटीकरणाची करून घेतोय.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आगामी २५-३० वर्षे या रस्त्यांना काही होणार नाही, अशी व्यवस्था असेल. त्यासाठी आता तातडीने निविदा प्रक्रिया राबवून राज्यस्तरीय नावाजलेल्या एकाच मक्तेदाराला ही कामे सोपविण्यात येतील. गुणवत्तापूर्ण व वेळेत हे काम पूर्ण होईल, असा आपला प्रयत्न असल्याचे श्री. महाजन म्हणाले.

शंभर कोटीतील कामे पाच महिन्यात करणार

विकासाची ही घोडदौड आता थांबणार नाही. मध्यंतरीच्या काळात आपले सरकार नव्हते, म्हणून अडीच- तीन वर्षे जळगावचा विकास थांबला.

आता नव्याने ही प्रक्रिया सुरु झाली आहे. या १०० कोटींच्या निधीतील कामे सुरू झाल्यानंतर ती येत्या चार- पाच महिन्यांत पूर्ण कशी होतील, यासाठी प्रयत्न करू. तज्ज्ञांची एक टीम या कामांवर लक्ष ठेवेल.

पुढच्या टप्प्यात आणखी निधी

यानंतर आणखी ५० कोटी व नंतर पुढच्या टप्प्यात ५० कोटी असा सुमारे २०० कोटींचा निधी जळगावात देणार आहोत. त्यासाठी शासन अनुकूल असून या विकासाच्या वाटचालीत आता कुठलाही अडथळा येणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या काळात ‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिन्यांचे नेटवर्क उभे राहिले. भुयारी गटार योजनेचे कामही मार्गी लागून पूर्णत्वास आले. आता त्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे कायमस्वरूपी चांगले ‘नेटवर्क’ उभे राहतेय, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT