Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : प्रभाग कर्मचारी 1 भाग एकाचवेळी करणार स्वच्छ; आरोग्य निरीक्षकांना आदेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील विविध भागातील साफसफाईच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता प्रभागातील एका भागात एकाचवेळी कर्मचारी साफसफाई करतील, असे आदेश आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी दिले आहेत.

महापालिकेत बुधवारी (ता. २२) आरोग्य निरीक्षकांची आढावा बैठक झाली. ( Health Officer Uday Patil ordered that employees will clean one area at one time jalgaon news)

त्यात प्रभागातील साफसफाईचा आढावा घेण्यात आला. तसेच काही प्रभागात असलेल्या नागरिकांच्या तक्रारींची माहिती घेण्यात आली. काही भागात कर्मचाऱ्यांतर्फे साफसफाई होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्याधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रभागात साफसफाईची नवीन रचना करण्याचा निर्णय घेतला.

सकाळी सात ते दहापर्यंत कर्मचाऱ्यांनी प्रभागात काम करायचे. त्यानंतर दहाला प्रभागातील सफाई करणारे सर्व कर्मचारी एकत्र करायचे आणि अ,ब,क,ड नुसार पहिल्यांदा ‘अ’ प्रभाग घेऊन त्या भागात गटारी, तसेच रस्त्यांची साफसफाई करायची. सर्व कचरा उचलून साफ करायचा.

दुसऱ्या दिवशी ‘ब’प्रभाग घेऊन अशीच साफसफाई करावयाची असा क्रमानुसार चारही प्रभागात स्वच्छता करावयाची आहे. या सफाईचा अहवाल आरोग्य निरीक्षकांनी दररोज आरोग्याधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे.

महापालिकेच्या संपूर्ण प्रभागात ही रचना करण्यात येणार आहे. महापालिकेचे व कंत्राटी कर्मचारी यांना एकत्र करून ही सफाई करण्यात येणार आहे. साफसफाईबाबत नागरिकांची तक्रार आल्यास संबंधित भागातील आरोग्य निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

आरोग्याधिकारी अचानक पाहणी करणार

शहरात साफसफाईची नवीन रचना गुरुवारपासून (ता.२३) कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक प्रभागात काम सुरू आहे, की नाही याची पाहणी आरोग्याधिकारी अचानकपणे करणार आहे. कर्मचारी काम करताना आढळले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT