Jalgaon News: महाआवास अभियान विशेष राज्य पुरस्कारात जळगाव जिल्ह्याचा ठसा! उद्या पुरस्काराचे वितरण

Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas Yojana sakal

Jalgaon News : महाराष्ट्र सरकारने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात जळगाव जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास व राज्यपुरस्कृत घरकुल योजनेत विविध संवर्गात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.

त्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांना महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. (Jalgaon bagged first and second place in Mahaavas Abhiyan Special State Award news)

केंद्र व राज्यपुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात ‘महाआवास अभियान २०२३-२४’ राबविण्यात येत आहे. अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री व इतरांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. २३) दुपारी तीनला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होईल.

या कार्यक्रमात ‘महाआवास अभियान २०२१-२२’ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना ‘महाआवास अभियान पुरस्कार’ व ‘महाआवास अभियान विशेष पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल. महाआवास अभियान पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्यात आणि महाआवास अभियान विशेष पुरस्कारात भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये (प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजना) जळगाव जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकाविला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये घरकुलांचा उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात आणि राज्यपुरस्कृत आवास योजनेत घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत बहुमजली इमारत बांधण्यात जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. लाभार्थ्यांना जागा करून देण्यासाठी ‘लँड बँक' तयार करण्यात जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

Pradhan Mantri Awas Yojana
Jalgaon Police Transfer: जळगाव अप्पर पोलिस अधीक्षकपदी नखाते; चंद्रकांत गवळी गुप्तचर प्रशिक्षण शाळेचे प्राचार्य

किमान दहा टक्के घरकुल बांधकामामध्ये फरशी-लादी, रंगरंगोटी, किचन गार्डन-परसबाग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा साधने व नेट बिलिंग आदींचा वापर करून तयार केलेली घरकुलात जिल्ह्याला द्वितीय क्रमांक मिळाला.

अधिकारी-कर्मचारी गटात राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माणचे जळगाव जिल्हा प्रोग्रामर विवेक मनोहर गोहिल यांनी द्वितीय, जिल्हा डेटा एन्ट्री ऑपरेटर गटात सुमीत चंद्रकांत बोरसे, तालुकास्तरावर डेटा एन्ट्री ऑपरेटर गटात सतीश मधुकर पवार (पारोळा) यांनी चौथा व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गटात करण चंद्रकांत पाटील (चाळीसगाव) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमामुळे जळगाव जिल्ह्याने महाआवास योजना पुरस्कारात बाजी मारली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार पंकज लोखंडे यांनी भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात विशेष मेहनत घेतली. त्यांची मेहनत व सकारात्मक पाठपुराव्यामुळे मागील तीन महिन्यांत जिल्ह्यातील ६६० लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध झाली आहे.

Pradhan Mantri Awas Yojana
Jalgaon News: जळगाव शहरात ‘नो बॅनर झोन’; गुन्हे दाखल करणे सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com