BT seed esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : खरिपासाठी आजपासून बीटी बियाणे विक्री; 27 लाखांवर बियाणे पाकिटे उपलब्ध

Jalgaon Agriculture : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी बुधवार (ता. १५)पासून बीटी बियाणे विक्री होणार आहे. यंदा ५ लाख ५८ हजार ३९२ हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी बुधवार (ता. १५)पासून बीटी बियाणे विक्री होणार आहे. यंदा ५ लाख ५८ हजार ३९२ हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार आहे. त्यासाठी यंदा २७ लाख ९२ हजार बीटी बियाण्यांची पाकिटांची मागणी केली आहे. ती जिल्ह्याला उपलब्ध झाली आहेत. मागील वर्षी ५ लाख ६२ हजार २६३ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती, तर २१ लाख २३ हजार बीटी बियाण्यांची पाकिटे आली होती. ()

यंदा बुधवारपासून बीटी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. साडेआठशे रुपयांना मिळणारी बीटी बियाणे यंदा ८६४ रुपयांना मिळत आहे. सुमारे १४ रुपयांची वाढ बीटी बियाण्यात झाली आहे.

तीन लाखांवर खतांचे आवंटन मंजूर

जिल्ह्यात यंदा ३ लाख २३ हजार ३०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यात युरिया १ लाख १ हजार ४००, डीएपी १५ हजार ५००, एमओपी २४ हजार, संयुक्त खते १ लाख १३ हजार २००, एसएसपी ७० हजार दोनशे, असे एकूण तीन लाख २३ हजार ३०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. तेही लवकरच उपलब्ध होणार आहे. (latest marathi news)

तक्रार निवारण कक्षाची स्थापना

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध व्हावेत, जादा दराने बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री होत असेल, तर त्यावर नियंत्रणासाठी निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत एक व १५ पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी एक, असे एकूण १६ ठिकाणी तक्रार निवारण कक्षाची स्थापना १५ मेपासून करण्यात येणार आहे.

प्राप्त होणाऱ्या तक्रारींची रजिस्टरमध्ये नोंद घेताना तक्रारदार शेतकऱ्याचे नाव, तक्रारीचे स्वरूप, तक्रार प्राप्त दिनांक, वेळ, शेतकऱ्यास केलेले मार्गदर्शन, त्याचा संपर्क पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक यांची नोंद घ्यावी. उचित कार्यवाहीसाठी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी गुण नियंत्रण निरीक्षकास दूरध्वनीद्वारे कळवावे. हे तक्रार निवारण कक्ष १५ मे ते १५ ऑगस्टपर्यंत खरीप व रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत कार्यरत राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT