Jalgaon Agriculture News : आंब्याच्या झाडांना 2 महिने अगोदरच मोहोर

आंब्याच्या झाडांना ५० ते ६० दिवस अगोदरच मोहोर आला असून, काही झाडे तर पूर्ण मोहरल्याचे दिसून आले आहे.
A blooming mango tree.
A blooming mango tree.esakal

Jalgaon Agriculture News : वातावरणात यावर्षी कमालीचे बदल होत असून, त्याचा परिणाम वृक्ष सृष्टीवरही दिसून आला आहे.

आंब्याच्या झाडांना ५० ते ६० दिवस अगोदरच मोहोर आला असून, काही झाडे तर पूर्ण मोहरल्याचे दिसून आले आहे. (Mango trees bloom 2 months earlier jalgaon agriculture news)

साधारणपणे अक्षय तृतीयेनंतर कैरी बाजार फुलतात. त्या अगोदर झाडांना मोहोर येऊन कैऱ्या पक्व होतात. मात्र यावर्षी मोहोर बराच अगोदर आला आहे. खानदेशात अमडदे, पोहोरे, करमाड, शनिमांडळ, बोरिस व चाळीसगाव भागात काही ठिकाणी पूर्वी आंब्याच्या बागा होत्या. मात्र त्या काळाच्या ओघात कमी झाल्या आणि कलम केलेल्या आंब्याची झाडे वाढली.

काही वर्षांपूर्वी बोरिस येथील झाडांना असाच बेमोसमी मोहोर आल्याची घटना घडली होती. मात्र यावर्षी बरीच झाडे मोहरली असून, त्याचा सुगंध आसमंतात दरवळू लागला आहे. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, त्यानंतरची थंडी असा बदल सध्या दिसू लागला आहे. कलम केलेल्या रोपांसह गावरान आंब्याची झाडेही सध्या मोहरली आहेत.

A blooming mango tree.
Jalgaon Agriculture News : रब्बीचा विमा एक रुपयात ज्वारीसाठी 30 नोव्हेंबरची मुदत

''वातावरणाच्या परिणामाचा हा बदल असून, वातावरण बदलले की झाडेही तसा बदल स्वतःमध्ये करतात. मोहोर येण्यासाठीचे वातावरण सध्या पोषक असल्याने आंब्याच्या झाडांना दीड ते दोन महिने अगोदर मोहोर आला आहे. आणि झाडे मोहरताना दिसत आहेत.''- महेश महाजन, केंद्रप्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल.

A blooming mango tree.
Jalgaon Agriculture News : केळी पीकविम्याबाबत 15 दिवसांत सकारात्मक निर्णय; शेतकऱ्यांचा दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com