Price board in market committee at Pachora
Price board in market committee at Pachora esakal
जळगाव

SAKAL Exclusive : हमीभाव 3180 चा, खरेदी मात्र 2100 ने! बाजार समिती खासगी व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक

सुधाकर पाटील

Jalgaon News : दुष्काळाने गिरणा पट्ट्यातील शेतकरी होरपळला गेला आहे. जो थोडाफार कापूस आला, त्याला म्हणावा तसा भाव नाही. हे कमी की काय शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन घेतले. मात्र ३ हजार १८० रूपयाचा हमीभाव असतांना बाजार समित्यामधे ज्वारी २०००- २१०० रूपये दराने खासगी व्यापाऱ्याकडून खरेदी केली आहे. (Jalgaon Cheating of farmers by private traders in market committee)

त्यामुळे क्विंटल मागे शेतकऱ्यांना तब्बल १०००-१२०० रूपयांचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यावर शासन कारवाई करणार आहे की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. कापसाला गेल्या महिन्यापर्यंत साडे सहा हजारापर्यंत भाव होता, त्यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली.

आता १० टक्के शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक आहे. त्याला ७०००- ७५०० हजार रूपये भाव मिळत आहे. हे सर्व आर्थिक गणित पाहता कापसाचा जेमतेम उत्पादन खर्च निघाला. शासनाने ज्वारीला ३ हजार १८० रूपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सद्यस्थितीत बाजार समितीत भावाचा फलक पाबिला तर ज्वारी २०००-२२०० रुपयापर्यंत दिसून येतो.

म्हणजे क्विंटल मागे तब्बल १०००-१२०० रूपयाची तफावत दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाडला जात असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीला रब्बी हंगामाची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांची निकड पाहून व्यापाऱ्याकडून लुट होत असल्याचे चित्र आहे.

हमीभाव केंद्र केव्हा सुरू होणार?

शासन दिमाखात जाहीरात करते, की आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खर्चाच्या दीडपट हमीभाव देत आहोत. मात्र प्रत्यक्षात ग्राऊंड रिअ‍ॅलिटी वेगळीच आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारात येत असताना एकही हमीभाव केंद्र सुरू नाही. (latest marathi news)

त्यामुळे व्यापाऱ्याकडून शेतकरींची लूट सुरू आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात १८ हमीभाव केंद्र सुरू होते. त्यातून १५९ शेतकऱ्यांकडून ३ हजार ४४८ क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात येत आहे आणि हमीभाव केंद्र बंद आहेत.

'मे' मध्ये कुणाचा माल खरेदी करणार?

शासनाच्या धोरणानुसार खरिपाची खरेदी फेब्रुवारीपर्यंत करण्यात येते तर रब्बीसाठी मे महिन्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. प्रश्न असा आहे, की रब्बी हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात संपतो. आता सर्व बाजार समीत्यांमधे धान्याची मोठ्याप्रमात आवक सुरू आहे.

त्यामुळे शासन मेमध्ये खरेदी केंद्र सुरू करेल, तेव्हा कोणाचा माल हमीभाव केंद्रात खरेदी करणार आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. सद्यस्थितीत व्यापारी कवडीमोल भावात ज्वारी खरेदी करत आहेत. मे महिन्यात जेव्हा हमीभाव केंद्र सुरू होतील तेव्हा तेच धान्य शेतकऱ्यांच्या नावाने हमीभावात विक्री होईल हे दरवर्षीचे चक्र आहे. त्यामुळे शासनाने वस्तुस्थिती पाहून तत्काळ हमीभाव केंद्र सुरू करावेत अशी मागणी होत आहे.

तर गुन्हे दाखल झाले पाहीजे

हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करू नये असा नियम आहे. ज्या ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करण्यात येत असेल त्या ठिकाणी कारवाई करण्याचे धोरण आहे, मात्र डोळ्यादेखत हमीभावपेक्षा तब्बल एक हजार कमी दराने ज्वारीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत कारवाई करणार आहे की नाही? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

"सध्या टीव्ही लावला की, गॅरंटी शब्द ऐकायला मिळतो. मात्र आता हमीभावाची गॅरंटी कोण देणार? ३१८० रूपयाचा ज्वारीला हमीभाव असताना हजार रूपयाच्या कमी दराने ज्वारी खरेदी केली जात आहे. त्यामुळे हमीभावाची गॅरंटी कुठे गेली? शासनाने तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावेत."- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी समन्वय समिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT