Akash Marathe, Sachin alias Tichkule, Pawan Baviskar
Akash Marathe, Sachin alias Tichkule, Pawan Baviskar esakal
जळगाव

Jalgaon Crime News : खून खटल्यात फिर्यादीवर दहशत माजविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : शहरातील तुकारामवाडीत गुंडाच्या टोळक्याने खुनाच्या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी आणि मुळ फिर्यादीच्या घरावर हल्ला चढविल्याची घटना बुधवारी (ता. ६) मध्यरात्री घडली होती. दोन वर्षांपूर्वी जिल्‍हा रुग्णालयात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील खटल्यात दहशतीने फिर्यादीवर दबाव आणायचा प्रयत्न झाला असून, दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. (Jalgaon Crime Attempt to terrorize prosecutor in murder case)

तुकारामवाडीतील हनुमान मंदिराजवळ अरुण भिमराव गोसावी कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. साधारण दोन वर्षांपूर्वी धुलिवंदनाच्या दिवशी झालेल्या वादातून २२ मार्च २०२२ला अरुण गोसावी आणि सुरेश विजय ओतारी यांच्यावर जिल्‍हा रुग्णालयात सशस्त्र हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला होता. गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले असून, खटला लवकरच सुरू होणार आहे. अशा परिस्थीतीत मूळ फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना जीवाची भिती दाखवून फितूर करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री त्यांच्या कुटुंबावर, घरावर हल्ला करून दहशत माजवण्यासाठी हा हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेत संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निरीक्षक बबन अव्हाड यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, छगन तायडे यांनी संशयितांचा रात्रंदिवस शोध घेत भूषण ऊर्फ भासा विजय माळी, आकाश ऊर्फ खुकलाल खंड्या ठाकूर, पवन ऊर्फ बद्या दिलीप बाविस्कर, सचिन ऊर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (सर्व रा. तुकारामवाडी).

आकाश ऊर्फ ब्रो रवींद्र मराठे, चेतन ऊर्फ बटाट्या रमेश सुशीर (दोन्ही रा. पिंप्राळा) यांना अटक केली असून, त्यांना बुधवारी (ता. १०) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सहाही संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT