License Suspended esakal
जळगाव

Jalgaon Crime : श्रीराम समर्थ ‘ॲग्रो’एजन्सीचा परवाना निलंबित! कृषी विभागाची कारवाई

Crime News : श्रीराम समर्थ ‘ॲग्रो’एजन्सीचा परवाना सहा महिन्यासाठी निलंबित करून कोणत्याही प्रकारचा खते, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी, विक्री, साठ्यास बंदी घातली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील जुने भिकमचंद जैन मार्केटमधील मे.श्रीराम समर्थ ‘ॲग्रो’एजन्सीचे संचालक विनोद साळुंके यांनी बनावट कागदपत्रे सादर केली यासह एजन्सीमध्ये विविध त्रूटी आढळल्याने त्यांचा परवाना सहा महिन्यासाठी निलंबनाची (Suspension) कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी केली. (Jalgaon Crime License of Shriram Samarth Agro agency suspended marathi news)

मे. श्रीराम समर्थ ‘ॲग्रो’एजन्सीचे मुळ मालक विनायक काळे आहेत. त्यांनी विनोद साळुंके यांना दुकान चालविण्यास दिले होते. मात्र साळुंके यांनी दुकानाचा परवान्याची बनावट कागदपत्रे बनवून दुकान माझेच आहे असे भासविले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विभागाने २३ नोव्हेंबर २०२३ ला अचानक मे.श्रीराम समर्थ ‘ॲग्रो’एजन्सीची तपासणी केली असता, त्यात कीटकनाशके, खते विक्रीचा परवाना आढळून आला नाही.

कृषी विभागाने दिलेले दरपत्रक, टोल फ्री क्रमांकही समोर लावलेला नव्हता. यामुळे विनोद साळुंके यांना दुकानाचा मुळे परवाना, संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी ३० जानेवारी २०२४ ची मुदत देवून त्याचदिवशी सुनावणी घेतली. सुनावणीत साळुंके यांनी सर्व कागदपत्रे बनावट असल्याची आढळून आली. (Latest Marathi News)

यावरून त्यांनी शासनाची घोर फसवणूक केल्याचे उघड झाले. सुनावणी वेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे, मोहीम अधिकारी विजय पवार उपस्थित होते. त्यावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी विनोद साळुंखे यांचा मे.श्रीराम समर्थ ‘ॲग्रो’एजन्सीचा परवाना सहा महिन्यासाठी निलंबित करून कोणत्याही प्रकारचा खते, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी, विक्री, साठ्यास बंदी घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT