Eknath Khadse  esakal
जळगाव

Jalgaon Eknath Khadse : एकनाथ खडसे कधी करणार भाजपमध्ये ‘एन्ट्री’?

Jalgaon News : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी (ता. ६) भाजपत प्रवेश करण्यासंबंधी भूमिका स्पष्ट केली. येत्या काही दिवसांत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होईल.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी (ता. ६) भाजपत प्रवेश करण्यासंबंधी भूमिका स्पष्ट केली. येत्या काही दिवसांत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होईल. आपण कुठल्याही अटी-शर्तींशिवाय भाजपत जात आहोत, अशी माहिती श्री. खडसे यांनी रविवारी (ता. ७) दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकत श्री. खडसे यांनी भाजपत जाण्याचे ठरविले आहे. (Jalgaon Eknath Khadse Entry in BJP party soon in presence of central leadership)

मात्र, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून मिळालेल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसे यांना विचारले असता, आपण कोणत्याही अटी-शर्तींशिवाय भाजपत प्रवेश करीत आहोत.

गेल्या काही दिवसांत पक्षातील केंद्रीय नेत्यांशी याबाबत चर्चा झाली. केंद्रीय नेतृत्व त्यासाठी सकारात्मक आहे. भाजप हे मी बांधलेले घर आहे. (jalgaon political news)

काही दिवस घरापासून वेगळा झालो होतो. आता पुन्हा घरात परतत आहे, असे ते म्हणाले. येणाऱ्या काही दिवसांत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आपला प्रवेश होईल. त्यासाठी काही दिवस आणखी वाट पाहावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood Alert: पुण्यात पूरस्थितीची चाहूल! खडकवासलातून मोठा विसर्ग, एकतानगरातील दोन सोसायट्यांत पाणी शिरले, महापौर नागुपरेंची पाहणी

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात पावसाचा तडाखा, माळीणजवळ दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Ashadhi Wari: ४३ वर्षांची अखंड परंपरा कायम! गंगापूरहून १२०० वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ; भक्ती, शिस्त आणि परंपरेचा अनोखा संगम

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT