Jalgaon MSEB : घरगुती वीज दरात 35 ते 50 रुपयांची वाढ; वीज वितरण कंपनीचा या महिन्यापासून दरवाढीचा शॉक

Jalgaon News : जिल्ह्यात होणारी वीजगळती व इतर कारणांमुळे होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी महावितरणच्या प्रस्तावित दरवाढीस वीज नियामक आयोगाने मंजूर दिली आहे.
MSEB
MSEB esakal

Jalgaon News : जिल्ह्यात होणारी वीजगळती व इतर कारणांमुळे होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी महावितरणच्या प्रस्तावित दरवाढीस वीज नियामक आयोगाने मंजूर दिली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू झाली असून भर उन्हाळ्यात व राजकीय रणधुमाळीत महावितरणाने ग्राहकांना शॉक दिला आहे. वीज दरवाढी सोबतच स्थिर आकारातही वाढ करण्यात आल्याने घरगुती वीज ग्राहकांचे बिल १० ते २५ टक्के वाढणार आहे. (Jalgaon MSEB Increase in domestic electricity tariff by Rs 35 to Rs 50)

दरवाढीचा हा शॉक घरगुती ग्राहकांसह कृषी, व्यापारी व औद्योगिक अशा सर्वच वीजग्राह‌कांना बसणार आहे. जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर जात असून उन्हाचा तडाखा वाढत असतांना दुसरीकडे एक एप्रिलपासून वीज दरवाढीचा 'शॉक' बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पस्तीस ते पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.

अशी आहे घरगुती ग्राहकांसाठी वीज दरवाढ

वीजवापर (युनिट)--जुने दर--नवे दर

- ००० ते १००---५.५८ रूपये--५.८८ रूपये

- १०१ ते ३००--१०.८१ रूपये--११.४६ रूपये

- ३०१ ते ५००--१४.७८ रूपये--१५.७२ रूपये

- ५०१ ते १०००--१६.७४ रूपये--१७.८१ रूपये

राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणच्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ केली आहे. स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. (latest marathi news)

MSEB
Jalgaon Protest News : भुसावळला ट्रकखाली डोके ठेवून आंदोलन! सणासुदीत रस्त्याचे खोदकाम केल्याने ‘रास्ता रोको’

कृषी वीजदरही वाढले

कृषी ग्राहकांसाठी वीजदर प्रति युनिट ४.१७ रुपयांहून ४.५६ रुपये इतका करण्यात आला आहे. तर कृषी इतर वापरासाठी वीजदर ६.८८ रुपये इतका आहे. गतवर्षी तो ६.२३ रुपये होता. गेल्या वर्षातील तुलनेत कृषीसाठी ३८.१८ व कृषी इतरांसाठी ४८.२८ टक्के आहे. देशात महाराष्ट्राचे दर सर्वाधिक असताना दरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली.

नागरिक काय म्हणतात.

दरवाढ मागे घ्या..

"वीज कंपनीने केलेली दरवाढ सर्वसामान्यांवर अन्याय करणारी आहे. एकीकडे महागाई वाढत आहे, दुसरीकडे विजेच्या दरात वाढ, सिलिंडरच्या दरातील वाढ, घरखर्च वाढविणारी आहे. ही दरवाढ मागे घेतली पाहिजे किंवा कमी केली पाहिजे." -हृषीकेष भावसार ( चंदूअण्णा नगर)

आर्थीक अडचण वाढविणारी

"सर्वसामान्यांच्या महागाईमुळे रोजचे जीवन कठीण होत आहे. त्यात विजेची दरवाढ घरखर्च चालविताना आर्थिक अडचण उभी करणारी ठरणार आहे. ही दरवाढ मागे घेण्यात यावी." -नरेंद्र सोनवणे (पिंप्राळा)

MSEB
Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभेच्या मैदानात ठाकरेंनी उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती? स्मिता वाघ यांना देणार मोठी टक्कर?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com