Fraud Crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : ट्रेडींगच्या नावाखाली 13 लाखांना गंडा

Jalgaon Fraud : ऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली आदर्शनगरातील रहिवासी तथा खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल १२ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud : ऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली आदर्शनगरातील रहिवासी तथा खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल १२ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. योगेश वसंत हेबाळकर (वय ५४) आदर्शनगरात कुटुंबीयासह राहतात. ते एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला आहेत. (Jalgaon Fraud 13 lakh cheated in name of trading)

योगेश हेबाळकर यांच्या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून त्यांना ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून १८ डिसेंबर २०२३ ते ७ मार्च २०२४ यादरम्यान वेळोवेळी एकूण १२ लाख ६७ हजार ५०० रुपये ऑनलाईन पद्धतीने विविध बँक खात्यात स्वीकारले.

त्यानंतर मात्र त्यांना कोणताही नफा, मोबदला न देता मुद्दल रक्कमही दिली नाही. वारंवार पाठपुरावा करून आपली रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर श्री. हेबाळकर यांनी शनिवारी (ता. ६) रात्री साडेआठच्या सुमारास दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

Latest Marathi News Live Update: बदनापूरमध्ये पाणीटंचाईची दाहकता

KCC Campaign : पशुपालकांसाठी खुशखबर! 'किसान क्रेडिट कार्ड'वर मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य शासनाची विशेष 'KCC' मोहीम

Cricket Viral Video: IPL काय बघताय? इथे तर पठ्ठ्याने मैदानावरच नांगर फिरवला; सामना थेट बंद! खेळाडू, रेफरी अन् प्रेक्षक हैराण

SRH vs CSK: चेन्नईच्या संघात मोठा बदल होणार! स्पर्धेतून बाहेर झालेल्या खलील अहमदची जागा घेण्यासाठी ४ खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT