Fraud Crime  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : दामदुप्पटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोटींचा गंडा!

Jalgaon News : शहरातील मध्यवर्ती गोलाणी व्यापारी संकुलात सधन ग्रुप ऑफ कंपनीतर्फे सधन मासिक आरोग्य विचार नावाने कार्यालय थाटले असून, कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील मध्यवर्ती गोलाणी व्यापारी संकुलात सधन ग्रुप ऑफ कंपनीतर्फे सधन मासिक आरोग्य विचार नावाने कार्यालय थाटले असून, कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी केली होती. अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांना तक्रार मिळताच आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने संबंधित कार्यालयावर छापा टाकून दस्तऐवजांसह कर्मचारी. (Investors cheated out of crores by luring Damdupat)

व्यवस्थापकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात सधन ग्रुप ऑफ कंपनीच्या नावे सधन आरोग्य विचार कार्यालय थाटून मॅनेजर, एंजटमार्फत गुंतवणूकदारांना दाम दुप्पटीचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

याबाबत त्यांनी अनेक दिवस पाळत ठेवून माहिती घेतल्यावर सधन ग्रुप ऑफ कंपनीमार्फत फ्रेंडली लोन एग्रीमेंट करून गुंतवणूकदारांकडून ठेवीच्या स्वरूपात लाखांच्या घरात रक्कम स्वीकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, गौतम सरदार, किरण अडकमोल.

जितेंद्र शिरसाळे यांच्यासह महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी अप्पर अधीक्षक अशोक नखाते यांना या गंभीर प्रकरणाची माहिती दिली. तक्रारी केल्यावर तत्काळ श्री. नखाते यांच्या सूचनेवरून आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने गोलाणी मार्केट गाठून कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. (latest marathi news)

स्टॅम्प पेपर, नोटरीवर गुंतवणूक

एखाद्या व्यक्तीकडून साधारण चार वर्षांच्या मुदतीसाठी १० लाख रुपये गुंतवण्यास सांगून त्या पोटी त्याला महिन्याला अमूक एक रक्कम देण्याचे आमिष दिले जाते. मुदत पूर्ण झाल्यावर एकूण रकमेचा चार वर्षांनंतरच्या तारखेचा धनादेश आजच दिला जातो. हा सर्व व्यवहार नोटरीद्वारे करार करून करण्यात येत असून, आजवर या कंपनीतर्फे एकट्या जळगाव शहर आणि तालुक्यातून किमान ३९ कोटींच्यावर रक्कम गुंतविल्याचा अंदाज आहे.

गुंतवणुकदारांचे भविष्य अंधारात?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कुठलीच मान्यता नाही. स्थानिक जिल्हा उपनिबंधक अथवा तत्सम अधिकाऱ्यांची कुठलीच मान्यता संस्थेकडे नाही. साधे शॉपॲक्ट लायसन्सही दोन दिवसांपूवीचे असून, लाखो रुपयांच्या गुंतवणुकीसाठी लोकांकडून पैसा उकळला जात आहे. ६ महिने, वर्षभर परतावा मिळेल. मात्र, नुसत्या नोटरीच्या अधारे परप्रांतीय व्यक्तीवर विश्‍वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्यांना भविष्यात पश्चातापाची वेळ येऊ नये, म्हणून याबाबत रिपब्लिकन पक्षातर्फे तक्रार करण्यात आल्याचे अनिल अडकमोल यांनी सांगितले.

"मंगळवारी दुपारी दोन-अडीचच्या सुमारास आर्थिक गुन्हेशाखेचे पथक गोलाणी मार्केटमध्ये धडकले. त्या कार्यालयात पाहणी केल्यावर उपस्थित कर्मचारी, व्यवस्थापकांना चौकशीसाठी बोलाविले होते. रात्री उशिरापर्यंत चौकशी करून संबंधितांना नोटीस बजावली. आर्थिक गुंतवणुकीची कागदपत्रे, दस्तऐवज आणि अधिकृत मान्यतेचे कागदपत्र मागविले असून, चौकशीत नेमका काय प्रकार आहे, ते समोर येईल." - प्रमोद कठोरे, सहाय्यक निरीक्षक, आर्थिक गुन्हेशाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: आली रे आली राधा मुंबईकर आली! सबसे पाटील राधा पाटीलची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT