Kulbhushan Patil, Lalita Patil esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : जळगावसाठी ठाकरे गटाच्या उमेदवारीबाबत आज चर्चा

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला आहे. उमेदवारीबाबत पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, जनतेचा कानोसा घेण्यासाठी पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बुधवारी (ता. २०) जळगावात येत आहेत. सर्वांशी चर्चा करून ते वरिष्ठांना अहवाल देतील. त्यानंतर पक्षाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याचे निश्‍चित झाले. (Jalgaon Lok Sabha election Discussion regarding Thackeray groups candidature for Jalgaon)

पक्षातर्फे भारतीय जनता पक्षातून नुकत्याच प्रवेश केलेल्या अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील, जळगावचे माजी महापौर कुलभूषण पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पक्षातर्फे अद्यापही उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. भाजपतर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याबाबत तयारी सुरू आहे.

पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिक येथे बैठक घेण्यात आली; तर मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडे जळगाव लोकसभा मतदारसंघ प्रथमच आला. भाजपबरोबर युती असताना पक्षाने प्रयत्न केला होता. (latest marathi news)

परंतु त्यांना जिल्ह्यातील कोणताच लोकसभा मतदारसंघ मिळाला नाही; परंतु आता महाविकास आघाडीत प्रथमच जळगाव लोकसभा मतदारसंघ मिळाल्याने पक्षाने उमेदवार विजयी करून भाजपकडून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी पक्ष सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सावंत आज जळगावात

पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत बुधवारी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. ते पक्षाचे पदाधिकारी तसेच मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांकडून उमेदवारीबाबत कानोसाही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर ते आपला अहवाल तातडीने वरिष्ठांना सादर करतील. त्यानंतर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT