Jalgaon Lok Sabha Election : रावेरला शरद पवार गटाकडून संतोष चौधरींच्या नावाला पसंती!

Jalgaon Lok Sabha Election : महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाला पक्षाने पसंती दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Santosh Chaudhary
Santosh Chaudharyesakal

Jalgaon Lok Sabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने रक्षा खडसेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाला पक्षाने पसंती दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्वतः चौधरींनी याबाबत दुजोरा दिलेला असला तरी पक्षाकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही.

दरम्यान, भुसावळला आज दुपारी संतोष चौधरी यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत ‘अब की बार संतोषभाऊ खासदार..’ अशी घोषणाबाजी झाली. (Jalgaon Lok Sabha election candidate Santosh Chaudhary from Sharad Pawar group in Raver)

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची शनिवारी निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केली. तत्पूर्वीच भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या यादीत जळगावातून स्मिता वाघ व रावेर मतदारसंघातून रक्षा खडसेंच्या नावाची घोषणा केली होती. भाजपने जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार जाहीर झालेले असताना महाविकास आघाडीकडून अद्याप दोन्ही ठिकाणच्या जागांवरील उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

खडसे पिता- कन्येचा नकार

मविआच्या जागावाटपातील समीकरणात जळगाव उद्धव ठाकरे गटाकडे तर रावेर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस शारद पवार गटाकडे आहे. पवार गटाकडून रावेर मतदारसंघासाठी सुरवातीला ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंचे नाव होते. परंतु, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्यास नकार दिला. त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसेंच्या नावाचाही प्रस्ताव पदाधिकाऱ्यांनी पुढे केला होता. मात्र, त्यांनीही त्यांची तयारी विधानसभेसाठीच असल्याचे सांगत लोकसभेसाठी असमर्थता दर्शवली.

संतोष चौधरींचे नाव

दोन दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक झाली. त्यात रावेर लोकसभेच्या जागेसाठी खडसेंच्या नावांची चर्चा संपुष्टात आली. मात्र, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, कॉन्ट्रॅक्टर विनोद सोनवणे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. पैकी रवींद्र पाटील व संतोष चौधरींची नावे आघाडीवर होती. त्यात सोमवारी चौधरींचे नाव निश्‍चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्वत: चौधरींनी त्यास दुजोरा दिला. (latest marathi news)

Santosh Chaudhary
Lok Sabha Election : "ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण..."; अजित पवारांबद्दल CM शिंदे-शिवतारेंमध्ये चर्चा

भुसावळात फटाके

सोमवारी दुपारी भुसावळला संतोष चौधरी समर्थकांनी त्यांच्या कार्यालयासमोर, बाजारपेठेत फटाके फोडले. चौधरींच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी बाजारात केली होती.

"लोकसभेसाठी आपण इच्छुक आहोत. त्यादृष्टीने मतदारसंघात दौराही सुरु केला आहे. परंतु, अद्याप पक्षाने कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. संतोष चौधरी यांचे नाव निश्‍चित झाल्याचे ऐकले, परंतु त्याबद्दल अधिकृत माहिती नाही."- ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष

"रावेर लोकसभा मतदारसंघातून आपण इच्छुक होतो. पक्षाचे नेते शरद पवार यांनी मला निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. दिवसभर मुंबईतच होतो, त्यातून हा विषय निश्‍चित झाला. आता उद्यापासूनच मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु करु."- संतोष चौधरी माजी आमदार, भुसावळ

Santosh Chaudhary
Kalyan Lok Sabha: श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ट्विस्ट? भाजपा पदाधिकाऱ्यांचे थेट बावनकुळेंना पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com