Smita Wagh, Lalita Patil  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगावसाठी अमळनेरच्या दोघी आमनेसामने

Jalgaon Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाकडून जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांची उमेदवारी आज जाहीर झाली आहे.

कैलास शिंदे, जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाकडून जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांची उमेदवारी आज जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाकडून ललिता पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले आहे. या दोन्ही महिला अमळनेर तालुक्यातील असून, त्या आमनेसामने लढणार आहेत.

भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेल्या श्रीमती स्मिता उदय वाघ या अमळनेरमधील डांगरी येथील रहिवासी आहेत. ते त्यांचे सासर आहे.(Jalgaon Lok Sabha Election Smita Wagh from Bharatiya Janata Party Against Lalita Patil from Shiv Sena Thackeray Party in Maha Vikas Aghadi)

याच तालुक्यातील जानवे-मंगरूळ गटातून त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले होते. २०१४ मध्ये भाजप व शिवसेनेच्या बहुमताची सत्ता महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पक्षाने विधान परिषदेवर आमदारकीही दिली होती. २०१९ मध्ये जळगाव लोकसभेची उमेदवारी दिली होती.

मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यांचे पती (कै.) उदय वाघ तब्बल दहा वर्षे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे जळगाव लोकसभा मतदारसंघ गेला आहे. या ठिकाणाहून अमळनेर तालुक्यातील ॲड. ललिता श्‍याम पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

त्या तालुक्यातील बामणी येथील रहिवासी आहेत. ॲड. ललिता पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असून, त्यांनी संपर्कही सुरू केला आहे. (latest marathi news)

ॲड. पाटील मूळ काँग्रेस पक्षाच्या आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू केली आहे. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या त्या प्रदेशाध्यक्ष होत्या. मात्र त्यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी नुकताच पक्षाला रामराम केला होता.

आता अमळनेर ठरणार केंद्र

एकेकाळी राजकारणाचे केंद्र पारोळा तालुका ठरले होते. पारोळा तालुक्यातून लोकसभेसाठी भाजपचे ए. टी. पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील यांच्यात लढत झाली होती. त्या वेळी ए. टी. पाटील विजयी झाले होते. २०१९ ला चाळीसगाव तालुका केंद्रबिंदू होता.

चाळीसगाव तालुक्यातील भाजपचे उन्मेष पाटील विरुद्ध मूळ चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत झाली होती. त्या वेळी पाटील विजयी झाले होते. आता अमळनेर तालुका केंद्र ठरणार असल्याचे दिसत असून, जनता कुणाला कौल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT