Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागात 32 प्रकल्प पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण

Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील अनेक ठिकाणी विविध रेल्वे प्रकल्पांचे उदघाटन केले. १० वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.
Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागात 32 प्रकल्प पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण

Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील अनेक ठिकाणी विविध रेल्वे प्रकल्पांचे उदघाटन केले. १० वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. भुसावळ विभागात एकूण ३२ प्रकल्पाचे उदघाटन केले. त्यात ‘मनमाड ते जळगाव तिसऱ्या रेल्वे लाईनचे, वन स्टेशन वन प्रॉडक्ट’चा शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधानांच्या हस्ते एकूण देशातील ५०६ प्रकल्पांचे उदघाटन राष्ट्राला समर्पित करण्यात आले. ३२ प्रकल्प भुसावळ विभागांतर्गत येतात. (Jalgaon Prime Minister inaugurated 32 projects in Bhusawal Railway Division)

ज्यात ‘एक स्टेशन-एक उत्पाद स्टॉल’, ‘दोन माल गोदामे’ अकोला आणि अंकाई किल्ला, बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, मनमाड-जळगाव तिसरी लाईन, एक जन औषधी केंद्र आणि दोन रेल्वे कोच रेस्टॉरंटचा समावेश आहे. भुसावळ विभागात हा कार्यक्रम नाशिक, मनमाड, धुळे, जळगाव, शेगाव, अकोला, बडनेरा, बऱ्हापूर आणि खंडवा येथे आयोजन करण्यात आले होते.

खंडवा स्टेशन येथील कार्यक्रमाला खासदार ज्ञानेश्‍वर पाटील, आमदार कंचन तनवे, कुंवर विजय शाह, बडनेरा येथे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, अकोला येथे आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, नाशिक येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होते.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे खंडवा स्टेशन येथे, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनीलकुमार सुमन जळगाव स्टेशन, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एम. के. मीना हे बडनेरा येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. (latest marathi news)

Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागात 32 प्रकल्प पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण
Jalgaon News : रेशन दुकानात आता ‘आय स्कॅनर’; रेशन दुकानांत चाचपणी सुरू

भुसावळ विभागातील प्रकल्पांची माहिती

वन स्टेशन वन प्रॉडक्ट (ओएसओपी) स्थानीक ‘विश्‍वकर्मा’ म्हणजेच कुंभार, सुतार, शिल्पकार, मोची, शिंपी, विणकर, लोहार आणि स्थानिक कारागिरांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन स्थानिक रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाला प्रोत्साहन देईल. जेणेकरून त्यांना व्यापकपणे पोहोचण्यास मदत होईल.

मनमाड-जळगाव तिसरी लाईनचा प्रकल्प

मनमाड ते जळगाव रेल्वे स्टेशन तिसरी लाईन प्रकल्प हा रेल्वेच्या पायाभूत सुविधांमधील एक मोठा टप्पा आहे. या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाची एकूण लांबी १६० किलोमीटर असून, एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची एकूण किंमत १ हजार ३५ कोटी १६ लाख आहे. या रेल्वेमार्गाच्या पूर्ततेमुळे व्यस्त मुंबई-भुसावळ मार्गावरील गर्दी कमी होईल आणि गाड्यांची गतिशीलता सुधारेल. गाडी आठवड्यातून पाच दिवस (बुधवार आणि गुरुवार वगळता) धावेल.

Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागात 32 प्रकल्प पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण
Jalgaon News : जळगाव जिल्ह्याचा 2047 पर्यंत होणार सर्वंकष विकास; कृषी, सेवा, उद्योगावर भर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com