Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : जळगावकरांनी 39 कोटी 80 लाखांची भरली महापालिकेची ऑनलाइन घरपट्टी

जळगाव महापालिकेतर्फे मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : जळगाव महापालिकेतर्फे मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या तीन वर्षांत नागरिकांनी तब्बल ३९ कोटी ८० लाख ऑनलाइन भरणा केला आहे.

महापालिकेतर्फे नागरिकांना ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.(Jalgaon residents have paid 39 crore 80 lakhs online mortgage of municipal corporation jalgaon news)

२०२१-२२ या वर्षी बारा हजार ११० मालमत्ताधारकांनी एकूण ११ कोटी ६० लाख ऑनलाइन भरणा केला. २०२२-२३ या वर्षी तब्बल तेरा हजार तीनशे नागरिकांनी १७ कोटी ५० लाख रुपये ऑनलाइन भरलेत.

या आर्थिक वर्षाचा विचार केला असता २०२३-२४ मध्ये आजपर्यंत दहा हजार चारशे मालमत्ताधारकांनी दहा कोटी ७० लाख ऑनलाइन जमा झाले आहेत. अजून आर्थिक वर्ष संपण्यासाठी साडेतीन महिने बाकी असून, या वर्षी पंधरा हजार मालमत्ताधारक आणि एकूण २० कोटीपर्यंत ऑनलाइन कर भरणा होण्याचा अंदाज आहे.

www.jalgaonmnc.org या वेबसाइटवर जाऊन नागरिक मालमत्ताकराचा ऑनलाइन भरणा करू शकतात. तसेच मनपामार्फत मालमत्ताधारकांना किती रक्कम अभय शास्ती योजनेत माफ होऊ शकतात याचे देखील मोबाईलवर संदेश पाठविण्यात येत आहे. पुढील आर्थिक वर्षात मनपामार्फत प्रत्येक मालमत्तेवर ऑनलाइन भरणा करणे सुलभ व्हावे म्हणून क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT