Onion packed in sacks after sale and counting. esakal
जळगाव

Jalgaon Onion News : गव्हाना मारले, पण कांद्याने तारले; चोपडा तालुक्यातील स्थिती

Jalgaon News : चोपडा तालुक्याच्या पूर्व भागातील अडावद, धानोरा, वटार, सुटकार, वर्डी, मंगरूळ, माचला, नारोद, खरद आदी शिवारात व पश्चिम भागात गणपूर, लासूर, चौगाव, गलवाडे शिवारात कांद्याची मोठी लागवड होते.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर : चोपडा तालुक्याच्या पूर्व भागातील अडावद, धानोरा, वटार, सुटकार, वर्डी, मंगरूळ, माचला, नारोद, खरद आदी शिवारात व पश्चिम भागात गणपूर, लासूर, चौगाव, गलवाडे शिवारात कांद्याची मोठी लागवड होते. आता हा हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना, या वर्षी गव्हाचे पाहिजे तेवढे उत्पन्न आले नाही. मात्र, शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्याने तारल्याचे दिसून आले आहे.

चोपडा तालुक्यात उन्हाळी कांदा खरीप कांद्यापेक्षा कमी क्षेत्रात लागतो. मात्र, खरीप कांद्यापेक्षा त्याचे उत्पादन जास्त येते. या वर्षी वातावरणाने गव्हापेक्षा कांद्याला साथ दिल्याने कांद्याचे उत्पादन बऱ्यापैकी आले. एकरी लाख ते दीड लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे आणि जागेवर ५०० ते ५७० रुपये गोणीप्रमाणे (प्रतिगोणी ४० किलो) विक्री झाली.

मात्र, दरवर्षी एकरी १८ ते २० पोते येणारा गहू या वर्षी १२ ते १५ पोत्यावर थांबला. गव्हाचा तालुक्यातील हंगाम मागील आठवड्यातच संपला असून, उन्हाळ कांद्याचा हंगाम पुढील आठवड्यात आटोपल. (latest marathi news)

या वर्षी गव्हापासून शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न व नफा मिळाला नाही. अवकाळी मुळे पेरणीला झालेला उशीर हेही त्याचे एक कारण ठरले. मात्र, कांद्याचे भरघोस उत्पन्न या वर्षी आले. ‘लाखाचा शेतकरी आणि कोटीवर कांदा पिकवणारे गाव’, अशा प्रकारची स्थिती या वर्षी राहिली.

कांदा जागेवर विक्री होत असल्याने गणपूर येथे ट्रक भरूनच सर्व कांदा विक्री होऊन गेल्याचे दिसून आले आहे. गव्हाणे या वर्षी मारले असले, तरी कांद्याने मात्र तारल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT