Jalgaon News : राजकारणापलीकडे जाऊन ज्येष्ठांप्रति आदराचे दर्शन! विमानतळावर नेते-पदाधिकाऱ्यांची मांदियाळी

Jalgaon News : निवडणुकीदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांवरून घमासान सुरू असताना काही प्रसंग राजकारणापलीकडचे संबंध आणि संस्कार दर्शविणारे घडतात.
Smita Wagh touching Sharad Pawar's feet at the airport, BJP national president J. P. Nadda welcoming by Guardian Minister Gulabrao Patil, MLA Suresh Bhole
Smita Wagh touching Sharad Pawar's feet at the airport, BJP national president J. P. Nadda welcoming by Guardian Minister Gulabrao Patil, MLA Suresh Bhole esakal

Jalgaon News : जामनेरच्या सभेसाठी शरद पवारांचे विमानतळावर आगमन झाले असता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या स्वागतासाठी इथे आलेल्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी पवारांचे चरणस्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. भाजप आमदार राजूमामा भोळेंनीही पवारांना वाकून नमस्कार केला. (Jalgaon Smita Wagh of BJP bowed to Sharad Pawar)

निवडणुकीदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांवरून घमासान सुरू असताना काही प्रसंग राजकारणापलीकडचे संबंध आणि संस्कार दर्शविणारे घडतात. अनेकदा परस्परविरोधी उमेदवार प्रचारफेऱ्यांच्या दरम्यान समोरासमोर आले असता पक्षीय भेद विरून ते एकमेकांशी गोडीने बोलतात..

वयोमानानुसार कनिष्ठ उमेदवार ज्येष्ठांना वाकून नमस्कारही करतो... राजकारणात टोकाचे शत्रू झाल्यानंतरही अनेकदा अशा आदर्श गोष्टी अनुभवायला मिळतात.. तसाच प्रकार रविवारी (ता. २१) सकाळी जळगाव विमानतळावर अनुभवास मिळाला.

स्मिताताईंनी घेतले पवारांचे आशीर्वाद

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बुलढाणा येथील उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ येणार होते. बुलढाण्याला विमानतळाची सुविधा नसल्याने ते जळगाव विमानतळावर उतरून बुलढाण्याकडे जाणार होते. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या जळगावातील उमेदवार स्मिता वाघ, आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे आले होते. (latest marathi news)

Smita Wagh touching Sharad Pawar's feet at the airport, BJP national president J. P. Nadda welcoming by Guardian Minister Gulabrao Patil, MLA Suresh Bhole
Jalgaon Lok Sabha Constituency : नणंद-भावजयीच्या शाब्दीक युद्धाने पेटले रण

याचदरम्यान शरद पवारांचे विमानतळावर आगमन झाले. ते जामनेरच्या सभेसाठी जाणार होते. पवार बाहेर निघत असताना स्मिता वाघ व भोळे यांनी त्यांचा वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. या वेळी पवारांसोबत जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गुलाबरावांनी केले नड्डांचे स्वागत

दुसरीकडे जे. पी. नड्डा यांचेही विमानतळावर आगमन झाले. ते बुलाढाण्याकडे हेलिकॉप्टरने निघणार होते. जळगाव व बुलढाण्याचे पालकमंत्री या नात्याने गुलाबराव पाटील यांनी नड्डा यांचे स्वागत केले. नंतर स्वत: पाटीलही नड्डा यांच्यासमवेत बुलढाण्याकडे रवाना झाले.

तत्पूर्वी राजूमामा भोळे, स्मिता वाघ, उज्ज्वला बेंडाळे, राधेश्‍याम चौधरी आदींनी श्री. नड्डा यांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकरही उपस्थित होते.

Smita Wagh touching Sharad Pawar's feet at the airport, BJP national president J. P. Nadda welcoming by Guardian Minister Gulabrao Patil, MLA Suresh Bhole
Jalgaon Sharad Pawar : व्यक्तिगत अडचणींमुळे खडसे भाजपत जाण्याच्या निर्णयापर्यंत : शरद पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com