voting machine esakal
जळगाव

Lok Sabha Election : हरियाणाहून 5490 VV Pat यंत्रे दाखल; जाणून घ्या काय आहे व्हीव्ही पॅट मशीन?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षापाठोपाठ आता प्रशासकीय पातळीवरही तयारीला सुरवात झाली आहे.

दरम्यान, मतदानाची खात्री करून देणारे व्हीव्ही पॅट (VVPat) यंत्रे जळगावात दाखल झाली आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (lok sabha election 5490 VVPat machines entered from Haryana jalgaon news)

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे विविध कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार हरियाणा राज्यातील पंचकुला येथून ५ हजार ४९० व्हीव्ही पॅट यंत्रे जिल्ह्यात दाखल झाली आहेत. ही सर्व यंत्रे वखार महामंडळाच्या गुदामात ठेवण्यात आली आहेत.

या सर्व मशिनची सलग तीन दिवस तपासणी करण्यात आली. १ ते ३ एप्रिलदरम्यान १०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शखाली या यंत्रांची तपासणी केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

जुलैमध्ये मतदान यंत्रे येणार

व्हीव्ही पॅट यंत्रानंतर आता जुलै महिन्यात मतदान यंत्रे आणि कंट्रोल युनिटही जळगावात येणार आहेत. ही यंत्रे आल्यानंतर त्यांची तपासणी जिल्हा निवडणूक विभागातर्फे केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

काय आहे व्हीव्ही पॅट मशीन?

व्हीव्ही पॅट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात इव्हीएम संलग्न असलेली स्वतंत्र प्रणाली आहे. यातून मतदाराने इव्हीएम मशिनमध्ये केलेल्या मतदानाची स्लिप मिळत असते. यात आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला आणि पक्षाला झाले आहे की नाही, याची खात्री पटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

सायप्रसकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका; भारतीय व्यवसायांसाठी मोठी संधी, विराज कुलकर्णींचा दावा

Hockey World Cup : पाकिस्तानचा मुर्खपणा, महत्त्वाचे सामान न घेताच खेळायला आले; रेफरीने बरोबर धारेवर धरले; माजी कर्णधार म्हणाला...

आईने इस्लाम स्वीकारला आणि आम्हालाही... शर्मिला टागोर यांची लेक सबा पतौडीचा खुलासा; म्हणाली - आम्ही कधीही मंदीरात...

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

SCROLL FOR NEXT