Minister Girish Mahajan while guiding district meeting of BJP on Tuesday. esakal
जळगाव

Girish Mahajan News : सांभाळून बोला, यापुढे खपवून घेणार नाही; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना इशारा

Girish Mahajan : एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाबाबत सांभाळून बोलावे, यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पक्षाचे नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan News : एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाबाबत सांभाळून बोलावे, यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पक्षाचे नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. रावेर व जळगाव या भाजपच्या दोन्ही जागा पाच लाखांच्या फरकाने निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. (Girish Mahajan)

लोकसभा निवडणुकीनिमित्त जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज बळिराम पेठेतील ब्राह्मण सभेच्या सभागृहात झाली. महामंत्री रवी अनासपुरे, जिल्हा प्रभारी व प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, रावेर लोकसभेच्या उमेदवार तथा खासदार रक्षा खडसे, जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, की एकनाथ खडसे म्हणतात, पक्षाला कोणीही विचारीत नव्हते, ते तर मूळ काँग्रेसमधून आले आहेत. आमदार (कै.) हरिभाऊ जावरे यांची ते बॅग पकडत होते. त्या वेळी आमच्याकडे अशोक फडके यांच्यासारखे मोठे कार्यकर्ते होते. खडसे काँग्रेसमधून आल्यावर पक्षाने त्यांना आमदारकी दिली, पदे दिली, दहा-दहा खात्यांचे मंत्री केले, तरीही ते पक्षावर बोलत असतात; परंतु आता त्यांनी सांभाळून बोलावे. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही.

काहींची नाराजी; पण ती संपली

खासदार रक्षा खडसे यांनी जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे त्याची किंमत पक्षाने करून त्यांना उमेदवारी दिली. रक्षा खडसेंच्या उमेदवारीचे कसे होईल? अशी विचारणा होत होती, माझा आणि त्यांचा छत्तीसचा आकडा आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, मला पक्षाने त्यांच्या उमेदवारीबाबत विचारले.

मी सांगितले, ‘काहीही हरकत नाही.’ त्यांच्या कामामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आता ती सर्व नाराजी संपली आहे. कार्यकर्ते जोमाने काम करून दोन्ही उमेदवार निवडून आणतील. (latest marathi news)

विजयानंतर आमच्याकडे लक्ष द्या

मंगेश चव्हाण म्हणाले, की जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघांत विरोधकांकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतीलच; पण दोन्ही उमेदवारांनी विजयी झाल्यावर आमच्याकडे अर्थात कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. व ‘अब की बार दोन्ही उमेदवार पाच लाख पार’ अशी घोषणाही त्यांनी दिली.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली. आपण तन, मन, धनाने भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणणार आहोत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. महामंत्री चौधरी यांनीही एकनाथ खडसेंनी सांभाळून बोलावे, असा सल्ला दिला. रक्षा खडसे, स्मिता वाघ, महामंत्री अनासपुरे, आमदार भोळे, महानगरप्रमुख उज्ज्वला बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले.

रक्षाताईच्या पाठिशी पूर्ण ताकद : डॉ. पाटील

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, रावेर मतदारसंघ मीदेखील पालथा घातला आहे. आमची स्वतंत्र यंत्रणा आहे, त्या यंत्रणेची पूर्ण ताकद रक्षाताईसाठी लावू. भाजपची ही केवळ बैठक आहे, त्यात एवढी गर्दी जमली. तर कार्यकर्त्यांचा मेळावा किती मोठा होईल, याचा प्रत्यय येतो. पक्षात आम्ही नवीन असलो तरी आपण आम्हाला सांभाळून घेतले, सन्मान दिला त्याबद्दल आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT