car fire sakal
जळगाव

धुर निघाल्याने कार थांबवली अन्‌ खाली उतरताच भडका; कुटुंब बचावले

धुर निघाल्याने गाडी थांबवली अन्‌ खाली उतरताच पेटली कार; कुटुंब बचावले

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर जळगावच्या खोटेनगर स्टॉपजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री घडली. मारवड सरपंच साळूंखे यांच्यासह महामार्गालगत (Highway accident car fire) उभ्या तरुणांनी प्रसंगावधान राखल्याने वेळीच मोठी दुर्घटना टळली अन्‌ सांळूखे कुटूंबीय बालंबाल बचावले. कारमध्ये सरपंच उमेश साळुंखे यांच्यासह कुटूंबातील दोन महिला, एक पुरूष व तीन लहान मुले प्रवास करीत होते. (jalgaon-highway-running-car-fire-in-road-family-safe)

मारवड येथील सरपंच उमेश साळुंखे हे नातेवाईकांसह कार क्रमांक (एम.एच.१९ सी.एफ ६३५५) ने जळगावात आले होते. जळगावातून पुन्हा गावी मारवडकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्गाने जात असतांना खोटेनगर स्टॉपजवळ कारच्या समोरील बोनेटमधुन अचानक धुर निघून आग निघू लागली. वेळीच प्रकार लक्षात आल्‍याने उमेश साळुंखे प्रसंगावधान राखत तत्काळ कार रस्त्यालगत थांबवून सर्वांना कारच्या बाहेर काढले. कारपासून सर्व दुर जाताच कारच्या आतही भडका उडाला.

नागरीक मदतीला

याठिकाणी प्रत्यक्षदर्शी विपुल पाटील, किशोर मिस्तरी, प्रथमेश मोरे, विलास मिस्तरी अशांनी मदतीला धाव घेत बोनेट उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उघडत नसल्याने कारचे समोरील सर्व हेडलाईट फोडून बोनेट उघडले. समोरच उमा पेंटस्‌ या दुकानावरील बोरींगचा पाईप लावून कारला लागलेली आग विझविली. नेमकी आग कशी लागली हे कळू शकलेली नाही. मात्र, सरपंच उमेश साळूंखे यांनी प्रसंगाधान राखत कार थांबवुन सर्वांना सुखरूप खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला. आगीत कारचे ५०-६० हजारांचे नुकसानाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT