जळगाव

रेल्वेने दिला फुकट्या प्रवाशांना दणका ! वसुल केला ६४ हजारांचा दंड

चेतन चौधरी

भुसावळ  : रेल्वे प्रशासनातर्फे विना तिकिटे प्रवास करणारे, अनियमित तिकीट यात्रा, ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ६० अनियमित प्रवाशांकडून ६४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. भुसावळ ते नासिक दरम्यान दोन रेल्वेगाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय. डी. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तिकीट तपासणी मोहीम करण्यात राबविण्यात आली.

६३ विनातिकीट प्रवाशी

या मोहिममध्ये एकूण ६३ अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे. ११ तिकीट तपासणी कर्मचारी आणि ४ आरपीएफ कर्मचारी यांनी प्रवाशांकडून एकूण ६४ हजार २३५ रूपये दंड वसूल केला. या मोहिमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या ५४ जणांकडून ५० हजार १८० रुपयांचा दंड वसूल केला. तर तिकिटांची बदली करणाऱ्या प्रवाशाकडून ३ हजार २५५ रुपयाचा दंड वसूल केला. ज्येष्ठ नागरिक कोट्याचा गैरवापर करणाऱ्या आठ जणांकडून १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, एसपींनी काढले आदेश

Latest Marathi News Update: कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन

अभिजीतला विमानतळावरून अधिकाऱ्यांनी अज्ञातस्थळी नेलं, संपर्क होईना; CJPच्या दाव्याने खळबळ, आंदोलनाला परवानगी

Pune: पुणे दुर्घटनेनंतर दारूमाफियांविरोधात राज्यव्यापी सर्जिकल स्ट्राईक; आठ दिवसांत ३,३१२ गुन्हे; २,७५७ जणांना अटक, ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त

IND vs AFG, Playing XI: भारतीय संघाने जिंकला टॉस, रवींद्र जडेजाच्या जागेवर पदार्पण करणारा मानव सुतार कोण?

SCROLL FOR NEXT