घरगुती वापराचे चक्क २१ हजार बिल; नगरसेवक उतरले रस्‍त्‍यावर

संजय पाटील
Monday, 5 October 2020

कोरोनामुळे हाताला काम नसल्याने मजुर वर्ग घरीच आहे. असे असताना वापर कमी असून देखील विजवितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले मिळाल्याने वीज ग्राहक वैतागले आहेत. दरम्यान दोन महिन्यापुर्वी शासनाकडून विज ग्राहकांना दिलासा मिळाला असे आश्‍वासित केल्यामुळे वीजग्राहकांनी बिले भरली नाही.

पारोळा (जळगाव) : घरगुती वापर कमी असताना महिन्याचे २१ हजाराचे बिलाचा धक्‍का ग्राहकास मिळाला आहे. या वाढत्या विजबिलाबाबत नागरिकात संतापाची लाट निर्माण झाली आहे. विजबिल भरावे कि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा अशा द्विधामनस्थितीत ग्राहकांनी आपली व्यथा नगरसेवक पी. जी. पाटील व छावा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्याकडे मांडली. यानंतर बालाजी मंदीर ते शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विज वाढी विरोधात मोर्चा काढत उपकार्यकारी अभियंता यांना व खासदार उन्मेष पाटील यांना मागणीचे निवेदन दिले.

कोरोनामुळे हाताला काम नसल्याने मजुर वर्ग घरीच आहे. असे असताना वापर कमी असून देखील विजवितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले मिळाल्याने वीज ग्राहक वैतागले आहेत. दरम्यान दोन महिन्यापुर्वी शासनाकडून विज ग्राहकांना दिलासा मिळाला असे आश्‍वासित केल्यामुळे वीजग्राहकांनी बिले भरली नाही. परिणामी त्यांना अनलाँकनंतर एकदम तीन महिन्याचे बिल अधिभार व इतर आकारणीचे बिले आल्याने ग्राहकांनी शेवटी सरकारबाबत नाराजी व्यक्त कत विजबिले भरलीत. परंतु अनलाँकनंतर तसेच घरगुती वापर कमी असतांना देखील विजग्राहकांना वाढीव बिले तर व्यावसायिक ग्राहकांना समायोजित भार लावल्याने विजग्राहक यांच्या मनात विजवितरण विरोधात चिड निर्माण होवुन बिल कमी करुन मिळावे; याबाबत नगरसेवक पी. जी. पाटील यांच्याकडे पाठपुरावाची मागणी केली. यावेळी विज ग्राहकांच्या समस्या व मध्यवर्ती कार्यालय शहरात असावे; यासह इतर मागण्यांची वरिष्ठ पातळीवर माहिती पाठवून योग्य दखल घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासदारांना निवेदन 
शहरातील वाढत्या विज बिलांच्या समस्येबाबत न्याय मिळावा; यासाठी नगरसेवक पी. जी. पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना निवेदन दिले. यावेळी शहरातील वाढत्या विजबिलाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola mahavitaran one month 21 thousand light bill