Girish Mahajan 
जळगाव

जळगाव जिल्हा बँक बिनविरोधसाठी महाजन तयार

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कैलास शिंदे

जिल्हा बॅंकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांनी मुंबईत श्री. खडसे यांची भेट घेतली.


जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँक निवडणूक बिनविरोध (Jalgaon District Bank Election)करण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) यांनी तयारी दर्शविली असून, रविवारी (ता. २९) सर्वपक्षीय बैठक होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिली.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बॅंकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांनी मुंबईत श्री. खडसे यांची भेट घेतली, तर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही त्यांची भेट घेतली. शिवाय एकनाथ खडसे, मंत्री गुलाबराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. सध्या काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे नेते सांगत आहेत. मात्र, त्यांची बिनविरोधसाठी चर्चेची तयारी असल्याचे श्री. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


दरम्यान, बिनविरोधसाठी भारतीय जनता पक्षाशी चर्चा करण्याची गरज आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की सहकार क्षेत्रात राजकारण नको, या हेतूने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. आपण स्वतः सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्याशी आपण जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन याबाबत चर्चा केली. त्यांनी तयारी दर्शविली आहे. आता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रविवारी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीमाशंकरमध्ये खरंच झाडांची कत्तल? व्हायरल व्हिडीओनंतर वनविभागाचं मोठं स्पष्टीकरण

Brazil Election : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! ब्राझीलमध्ये फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांचा पराभव करत लुला चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी

Livestock Insurance Scheme : पशुधन विम्यासाठी आता 85 टक्के अनुदान; एका कुटुंबातील 10 जनावरांना मिळणार विमा संरक्षण, पशुपालकांना मोठा दिलासा

Maharashtra Live News : कर्जत- टोरेंट पॉवर प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक, आज दुपारी ३ वाजता आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे करणार पाहणी

Jio IPO Allotment Status: जिओचे शेअर्स मिळाले की नाही? एका क्लिकवर चेक करा स्टेटस; लिस्टिंग कधी? पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT