जळगावात पाकिस्तानी काडतुसांसह विदेशी पिस्तूलधारी अटकेत

Jalgaon Crime News :नशा उतरल्यावर नेमके हे विदेशी पिस्तूल त्याने आणले कोठून याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
crime
crime
Updated on



जळगाव : हरिविठ्ठलनगरातील तडवी गल्लीत कंबरेला पिस्तूल (Pistol) लावलेला नशेत तर्रर्र दारुडा हेलकावे घेत घरी आला. घरात शिरल्यावर ‘ए आऽऽय... इसे कहते है घोडा’ म्हणत स्वतःच्या आईवरच पिस्तूल ताणल्याने गल्लीतून एकाने पोलिस निरीक्षकांनाच (Police inspectors) फोनवरून गुप्त माहिती दिली. रामानंदनगर डीबी पथकाने (Ramanandnagar Police Station) चार जिवंत काडतुसे आणि विदेशी पिस्तुलासह विनोद बापू शिंदे यास अटक केली.

crime
जळगाव जिल्ह्यातील धरणात वीस टक्के कमी साठा


सकाळी सातलाच पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याच्या माहितीवरून गुन्हे शोधपथकाचे संजय सपकाळे, प्रवीण जगदाळे, सुशील चौधरी यांच्यासह सहाय्यक निरीक्षक राजेश शिंदे यांनी धाव घेत संशयिताला त्याच्या घरातच ताब्यात घेतले. त्याच्याकडून विदेशी बनावटीचे काळे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्याची नशा उतरल्यावर नेमके हे विदेशी पिस्तूल त्याने आणले कोठून याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

crime
जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प; हॉलमार्क सक्ती विरोधात बंद

काडतूस पाकिस्तानचे
एरवी ५.६२ किंवा ७.६२ एमएम बोअर असलेल्याच अधिकृत पिस्तूल विक्रीची आणि बाळगण्याची परवानगी असते. ९.०० एमएम पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर सैन्य दलातील अधिकारी पोलिस अधिकाऱ्यांनाच दिले जाते. असे असताना विनोद शिंदे या खासगी वाहनचालकाकडे विदेशी बनावटीचे पिस्तूल आढळले असून, त्यात ‘पीएके’ नमूद असलेले काडतूस सापडल्याने खळबळ उडाली आहे. जप्त पिस्तुलाचा पंचनामा करून तत्काळ फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी रवाना करण्यात येणार असल्याचे निरीक्षक किरण शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


‘वास्तव’चा रघू डोक्यात

दारूच्या नशेत हेलकावे घेत घरात शिरल्यावर समोर त्याची आई आली. तिने रागवताच विनोदने पिस्तुलाची ओळख दाखवत ‘वास्तव’ चित्रपटातील संजय दत्तप्रमाणे, आईला पिस्तूल लावले अन्‌ पेालिस धडकले. ‘ऐसे क्या देख रही है आऽऽय... इसे कहते है घोडा...’ अशाच पद्धतीचा ड्रामा आज अटकेतील विनोद शिंदे याने त्याच्या घरात केला आणि याच वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com