जळगाव

जळगाव शहरात लशींचा तुटवडा, लसीकरण पुन्हा ठप्प !

सर्वच केंद्रावरील लशी संपल्याने लसीकरण केंद्रावर फलक लावण्यात आले होत.

सकाळ वृत्तसेवा



जळगाव ः जिल्ह्यातील लशींचा (vaccin) पुरवठा न झाल्याने सोमवारी (ता. १०) पुन्हा शहरातील लसीकरण केंद्रे ((vaccination center) लशींअभावी बंद होती. अनेक नागरिकांना (citizen) सोमवारी सकाळीच हजर राहूनही लस न घेताच परतावे लागले. त्यामुळे मंगळवार (ता. ११)पासून सुरू होणारी नवीन चार केंद्रे लशींअभावी सुरू होतील का, असा प्रश्‍न आहे.


( jalgaon city corona vaccines shortage vaccines stopped)

शहरात रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, शाहू महाराज हॉस्पिटल, शिवाजीनगरातील रुग्णालयात लसीकरण सुरू होते. सोमवारी मात्र सर्वच केंद्रावरील लशी संपल्याने लसीकरण केंद्रावर फलक लावण्यात आले होत. शाहू महाराज, शिवाजीनगरातील केंद्र सकाळी काही तासच सुरू होते. नंतर तेही बंद झाले.

सात हजार लशींचे डोस
कोव्हिशील्डचे सात हजार, तर कोव्हॅक्सिनचे अडीच हजार डोस जिल्ह्यात सायंकाळी येतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. ते डोस सकाळीच संबंधित केंद्रांवर पोचविले जातील. त्यामुळे उद्या लसीकरण केंद्र सुरू राहतील.

आजपासून नवीन लसीकरण केंद्रे
शहरात लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता मंगळवार (ता. ११)पासून चार नवीन लसीकरण केंद्रे शहरात सुरू करण्यात येणार आहे. सर्वच केंद्रांवर फक्त कोव्हिशील्ड लसी देण्यात येतील. कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने त्याची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध झाल्यानंतर त्याही लसी देण्यात येतील.

वयोगटानुसार केंद्रे
शहरातील नागरिकांसाठी चार नवीन शासकीय कोविड लसीकरण केंद्रांमध्ये स्वाध्याय भवन (गणपतीनगर), मुलतानी हॉस्पिटल (मेहरुण) ही दोन कोविड लसीकरण केंद्रे १८ ते ४५ वयोगट असलेल्या व्यक्‍तींसाठी असतील. शाहीर अमरशेख दवाखाना (शनिपेठ), कांताई नेत्रालय (निमखेडी रोड) जळगाव ही कोविड लसीकरण केंद्रे फक्त ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटांसाठी असतील. कोव्हिशील्ड लसीकरणाचे लाभार्थीनिहाय दुसरा डोस व पहिला डोसचे अनुक्रमे ७०:३० असे प्रमाण राहील.

कुपन देताना चित्रीकरण होणार
४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटाचे लसीकरण होत असलेल्या केंद्रांवर रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना उपलब्ध लसीइतके कुपन देण्यात येतील. त्याबाबत नोंदवहीत नोंदी घेण्यात येऊन कुपन वाटपाचे चित्रीकरण करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT