esakal | जळगावला दिलासा..महिन्याभरात प्रथमच १५च्या आत मृत्यु !
sakal

बोलून बातमी शोधा

covid

जळगावला दिलासा..महिन्याभरात प्रथमच १५च्या आत मृत्यु !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : जिल्ह्यात महिनाभरानंतर प्रथमच दिवसभरातील मृत्युची संख्या १५ च्या आत नोंदली गेली. सोमवारी प्राप्त अहवालात (report) कोरोनामुळे (corona) गेल्या २४ तासांत १२ रुग्णांचा (patient) बळी (deth) गेला, तर नवे ८४४ रुग्ण समोर आले. दिवसभरात ८२२ रुग्ण बरेही झाले.

हेही वाचा: भाजप नेत्यांच्या धमक्यांना भुजबळ आणि मी घाबरत नाही !

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या (Corona infection) दुसऱ्या लाटेत जीवितहानी अधिक होत आहे. दीड महिन्यापासून दररोजच्या मृत्युंची संख्या दहा-पंधरापेक्षा अधिक नोंदली जात असून ती महिनाभरापासून १८, २० व त्यापेक्षा अधिक राहिली. सोमवारी ३० दिवसांनंतर प्रथमच एका दिवसातील मृत्युसंख्या १५च्या आत म्हणजे १२ नोंदली गेली. जिल्ह्यातील एकूण बळींचा आकडा २३४९ वर पोचला आहे. नॉन कोविड (Non covid), न्युमोनिया (Pneumonia), संशयित, सारी, कोविड पश्‍चात व्याधींमुळे सोमवारी १० मृत्यू झाले.

चाचण्याही घटल्या
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील चाचण्याही घटल्या आहेत. रविवारी साडेपाच हजार चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले, तर सोमवारीही ही संख्या ५ हजार ७०६ एवढीच मर्यादित होती. त्यातून ८४४ नवे रुग्ण समोर आले एकूण रुग्णांचा आकडा १ लाख ३० हजार ७३१ झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ८२२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १८ हजार ५६८वर पोचला आहे. रिकव्हरी रेट ९०.७० टक्के झाला आहे.


हेही वाचा: कोरोनाग्रस्तांची बेडसाठी धावपळ..आणि आमदारांनी घेतली झाडाझडती !

जळगावात नवे रुग्ण शंभराच्या आत
जळगाव शहरात दीड महिन्यानंतर प्रथमच दिवसभरातील नवे रुग्ण शंभराच्या आत आढळून आले. सोमवारी प्राप्त अहवालात शहरात केवळ ६१ रुग्ण आढळून आले असून १२० रुग्ण बरे झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन १५००वर आली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १२ पैकी तब्बल ६ बळी एकट्या जळगाव शहरातील आहेत. त्यात एका ३५ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे.

हेही वाचा: गाळेधारकांची आग्रही मागणी; आम्हाला न्याय देणारा निर्णय घ्या !

चोपडा, भुसावळ हॉटस्पॉट
जिल्ह्यातील भुसावळ व चोपडा तालुक्यात संसर्ग तीव्रतेने वाढतोय. सोमवारी भुसावळ तालुक्यात १३२, चोपडा तालुक्यात १५० रुग्ण समोर आले. अन्य ठिकाणी आढळलेले रुग्ण : जळगाव ग्रामीण १०, अमळनेर १२, पाचोरा २०, भडगाव १५, धरणगाव ६०, यावल २३, एरंडोल ७४, जामनेर ४७, रावेर २६, पारोळा ३, चाळीसगाव ९४, मुक्ताईनगर ५२, बोदवड ४९, अन्य जिल्ह्यातील १०.