funeral funeral
जळगाव

पाऊस पडत नाही..म्हणून गावकऱ्यांनी काढली प्रेतयात्रा

अनेकांची तर अंत्यात्रेत रडून रडून पार दमछाक झाली. या घटनेमुळे गावातील आबालवृद्धांची मात्र चांगलीच करमणूक झाली.

प्रा. हिरालाल पाटील


कळमसरे (ता.अमळनेर) : अनेक ठिकाणी मान्सून धो धो बरसत (Rain) असतांना गांधली ता.अमळनेर परिसरात मात्र अजूनही पावसाची प्रतिक्षाच दिसून येत आहे. जुलै उलटल्यावर देखील पेरण्या (Sowing) खोळंबल्या असुन दुबार पेरणीचे पीक मोड आलेलं आहे. त्यामुळे तिबार पेरणीचे संकट बळीराजा (Farmer) समोर उभे ठाकले आहे. अशातच ग्रामीण भागात विविध अख्यायिका प्रचलित असतात. व त्याचाच एक भाग म्हणून जिवंत माणसाला तिरडीवर झोपवून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज गांधली येथे जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढण्यात आली.

(jalgaon district no rain gandhali villagers symbolic funeral)


गावातीलच भिकन पाटील हा प्रतिकात्मक शव म्हणून तिरडी वर विराजमान झाला. गावातील काही युवक खांदेकरी व ग्रामीण बोलीभाषेतील आग्या ची भूमिका शशिकांत पाटील याने पार पाडली. अनेकांची तर अंत्यात्रेत रडून रडून पार दमछाक झाली. या घटनेमुळे गावातील आबालवृद्धांची मात्र चांगलीच करमणूक झाली. आता फक्त वरुणराजाने कृपा केली म्हणजे पुढील कार्यक्रम करायची गरज पडणार नाही अशी उपहासात्मक चर्चा गावात सुरू होती...


पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे
श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड घालणं गरजेचे असून अशा प्रकारे काहीतरी करून पाऊस येईल ही अपेक्षा करण्यापेक्षा पर्यावरण संवर्धनावर लक्ष दिले वृक्षलागवड केली तर नक्कीच पाऊस येईल असे मत गावातील सुज्ञ मंडळीं मांडत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: पाणी उशिरा आणलं म्हणून शिक्षकांकडून मारहाण; घाबरलेली लेकरं जंगलात पळाली अन्..., पालघर ZP शाळेतील घटना

Bihar : कॉर्पोरेटमधली नोकरी सोडून नेत्याचा मुलगा राजकारणात उतरला, निवडणूक न लढता थेट मंत्रि‍पदी वर्णी; आई आमदार, मुलगा मंत्री

Asia Cup Rising Stars: भारत अन् पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये! कसे आहे वेळापत्रक, कुठे पाहाणार सामने?

Gadhinglaj News: गडहिंग्लज पालिका ; सत्तेच्या सोपानासाठी मोहऱ्यांची मोलाची भूमिका, निवडणूक रिंगणात बहुतांशी नवे चेहरे

Thane News : कोपरी 'बीएसयूपी'तील ८११ कुटुंबांना दिलासा! सदनिकांची दीड लाखांची नोंदणी रक्कम १०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT