Death 
जळगाव

पारोळाः पैशांचा वाद..आईसमोरच विवाहित मुलीचा विषपाजून खून

घटनेनंतर संशयीत घाबरला त्याने विवाहितेला दुचाकीवर बसून पारोळा कुटीर रुग्णालयात आणले त्यानंतर पसार झाला.

संजय पाटील

पारोळा : पैशाच्या वादातून 28 वर्षीय विवाहितेला (Woman) मारहाण (Beating) करत जबरदस्तीने आईसमोर विष पाजून तिचा खून (Poisoning Murder) केल्याची घटना ता. 13 रोजी सकाळी नऊ वाजता धरणगाव रस्ता जवळील एका शेतात (Farm) ही घटना घडली.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवार रोजी सकाळी उषाबाई प्रकाश खाडे रा.राजीव गांधी नगर पारोळा या आपली विवाहित मुलगी पूजा संदीप शिंदे तिच्या सोबत शेतात काम करत होत्या. अचानक झोडगे येथील रहिवासी संशयित पंकज हिलाल चौधरी हा दुचाकीने शेतात आला त्याने माझे पंधरा हजार रुपये द्यावे अशी मागणी करत पूजाला मारहाण केली. पती त्रास देत असल्याने ती दोन वर्षापासून माहेरात असून मी कोणतेही पैसे घेतले नाही पती किंवा सासरे यांनी पैसे घेतले असतील असे पूजाने त्याला सांगितले मात्र संशयित चौधरीने काहीही ऐकून न घेता पूजाचा गळा दाबला तसेच जवळचे पडलेले विषारी औषध तिला पाजले. पूजाच्या आई समोरच ही घटना घडली. पूजाची आई उषाबाई खाडे यांनी विरोध केला त्यांच्यात झटापटी झाली मात्र त्यांना ढकलून दिले.


संशयिताने आणले रूग्णालयात
दरम्यान घटनेनंतर संशयीत पंकज चौधरी घाबरला त्याने पूजाला दुचाकीवर बसून पारोळा कुटीर रुग्णालयात आणले त्यानंतर संशयित पसार झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस करीत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT