esakal | साक्रीः लग्नापूर्वी तरुणावर काळाची झडप..डेंग्यूमुळे मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue Death

साक्रीः लग्नापूर्वी तरुणावर काळाची झडप..डेंग्यूमुळे मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साक्री : शहरातील कुटूंबाचा आधार असलेल्या एकुलत्या एक आधार असलेल्या तरूणाचा डेंग्यूसदृश (Dengue) आजाराने नाशिक येथे उपचार सुरू असतांना मृत्यू (Death) झाला. सदर घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर साथीच्या आजांरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलले जाण्याची अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: धुळे-नंदुरबार जिल्हा बँक निवडणूक; बिनविरोधासाठी वाटाघाटी!

कुणाल चव्हाण असे मयत तरुणाचे नाव असून, आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. विशेष म्हणजे येत्या २९ नोव्हेंबर रोजी त्याचा मामाच्या मुलीशी विवाह होणार होता. मात्र तत्पूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली अन् हसता खेळता चव्हाण परिवार एकुलत्या मुलाच्या अचानक जाण्याने दुःखाच्या खाईत लोटला गेला.

अचानक प्रकृती खालवली..

कुणाल हा शहरातील सि. गो. पाटील महाविद्यालयात सहाय्यक प्रयोग शाळा परिचर होता. त्याचे वडील मुद्रांक विक्रेते असून सेतू सेवा केंद्र चालवतात, तर आई निजामपूर पोलीस ठाण्यात ए. एस. आय. म्हणून कार्यरत आहे. तर कुणालला दोन विवाहित बहीणी आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी कुणालची तब्येत अचानक बिघडली. त्याला उपचारार्थ धुळे आणि तेथून नाशिक येथे खाजगी इस्पितळात हलवण्यात आले. त्यावेळेस त्याला डेंगू सदृष्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले. आणि अवघ्या दोन-तीनच दिवसांत त्याची प्रकृती खालावली. अखेर काळाने त्याच्यावर झाडप घातली.

हेही वाचा: बीएचआर घोटाळाः पुणे आर्थिक गुन्हेशाखेचे २८ बँकांना पत्र

गावात उपायोजनांची गरज..
सध्या शहरात साथीच्या आजारांनी आपले पाय पसरल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. विविध आजारांनी ग्रस्त रूग्णांनी दवाखाने फुल्ल आहेत. अशा परिस्थितीत डासांच्या उत्पत्तीमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून साक्री शहर व परिसरात डंग्यू आजाराचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने गावात स्वच्छतेसह फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

loading image
go to top