जळगाव

बर्थडेचा केक कापण्यासाठी मित्राकडून आणला चॉपर आणि दोघे पोहचले ‘लॉकअप’ मध्ये

रईस शेख

जळगाव : वाढदिवसाला केक कापण्यासाठी मित्राकडून चाॅपर घेवून फिरत असतांना पोलिसांनी एका तरुणाला पकडले. चौकशीतून मित्र डान्स कोरियोग्राफरकडून चॉपर आणल्याचे माहिती मिळताच बर्थडे बाॅय आणि मित्फिर डान्स कोरियोग्राफर दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 

आवश्य वाचा- मातृछत्र हरपले अन् मामाच बनले आई 

शहरातील वैष्णवी पार्ककडे जाणाऱ्या रोडवरील मातोश्री शाळेजवळ एका तरुणाच्या हातात चॉपर असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांच्या पथकातील राजेंद्र पाटील, अशोक महाजन, सुधाकर अंबोरे, अनिल देशमुख, अशरफ शेख, दीपक शिंदे, इंद्रिस पठाण यांनी रविवारी (ता. २२) दुपारी मातोश्री शाळेजवळून पवन नारायण कापसे (वय २५, रा. वैष्णवी पार्क, मातोश्री शाळेजवळ) याला अटक केली.

त्याच्या जवळून पोलिसांना धारदार चॉपर मिळून आल्याने त्याची चौकशी केली असता, वाढदिवसाला केक कापण्यासाठी मित्राकडून चॉपर आणल्याचे त्याने सांगितले. त्याचा मित्र, तथा डान्स कोरिओग्राफर परेश गोयर (वय २६, रा. वैष्णवी पार्क) याला पेालिसांनी ताब्यात घेत दोघांविरुद्ध तालुका पोलिसांत बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT