shiv sena movement 
जळगाव

जळगावात शिवसैनिकांनी डुक्‍करांच्या गळ्यात बांधल्‍या राणेंच्या प्रतिमा

भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तसेच पदाधिकारी यांच्याकडून झाला.

भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह विधान करून त्यांचा अवमान केल्याचा संताप शिवसेनेकडून राज्यभरात दिसून येत आहे. त्याचे पडसाद जळगाव शहरात देखील आज उमटले असून महानगर शिवसेनेतर्फे(Shiv Sena) मंत्री राणे यांची प्रतिमा डुक्‍करांना बांधून निषेध करून जोरदार आंदोलन भाजप (BJP) कार्यालयाबाहेर केले. यावेळी भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी कोंबड्या फेकल्या तसेच शिवसैनीकांनी भाजप कार्यलायात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता भाजप कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून दोन्ही कार्यकर्त्यांना शांत करून परिस्थीती नियंत्रणात आणली. त्यानंतर शिवसैनिकांनी शहर पोलिस ठाण्यात (city police station) तक्रार दाखल करण्यासाठी गेले.

shiv sena movement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात शिवसेना संतप्त झाले असून त्याचे पडसाद राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनातून उमटले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन केले जात असून आज जळगाव महानगर शिवसेनेकडून थेट डुकरांना मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमा बांधून भाजप कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी मंत्री नारायण राणेंच्या विरुध्द जोरदार घोषणा बाजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केले. जळगाव शहरात विरोधात निषेध नोंदवला जात आहे. वेगवेगळ्या घोषणाबाजी नारायण राणेंच्या विरोधात केले जाताहेत. नारायण राणे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सुद्धा राज्यांमधील शिवसैनिक आक्रमक होऊन नारायण राणे यांच्या विरोधामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी गुन्‍हा दाखल करण्यात आले असून जळगावात देखील याची गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

shiv sena movement

डुकरांच्या गळ्यात राणेंच्या प्रतिमा

राज्‍यात नारायण राणे यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या जळगाव शहर महानगरतर्फे थेट डुक्‍कर आणून त्‍यास नारायण राणे यांच्‍यासह त्‍यांच्‍या मुलांच्‍या प्रतिमा बांधून निषेध केला.

भाजप कार्यालयावर मोर्चा

जळगाव शहरातील बळिराम पेठ मधील भाजपचे वसंत स्मृती कार्यालयाबाहेर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी भाजप कार्यलायत कोंबड्या सोडल्या. तर भाजप कार्यालयात शिवसेैनिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला परंतू यावेळी भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी वेळेत धाव घेवून पुढील दोन्ही कार्यकर्त्यांना शांत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT