bjp  
जळगाव

कोंबड्या फेकाफाकी नंतर..भाजपकडून कार्यालयाचे शुद्धीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा



जळगाव :
शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर (BJP Office) कोंबड्या फेकत आंदोलन (Movement) केले होते. श्रावण महिना सुरू असल्याने कार्यालय अपवित्र झाले, असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी (ता. २७) होमहवन करून पक्ष कार्यालयाचे शुद्धीकरण केले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. जळगावातली शिवसेनेतर्फे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेनेतर्फे भाजप कार्यालयात कोंबड्या फेकण्यात आल्या होत्या. शिवसेनेने फेकलेल्या कोंबड्यामुळे भाजप कार्यालय अपवित्र झाले असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. यात भाजप महिला व आध्यात्मिक आघाडी यांनी म्हटले आहे की, आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंचा पवित्र महिना श्रावणमास सुरू असताना या श्रावण महिन्यात कोंबडी फेकल्याने हे शुद्धीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस रेखा वर्मा, नीतू परदेशी, सरोज पाठक, रेखा कुलकर्णी, पूजा चौधरी, छाया सरस्वत, तृप्ती पाटील, ज्योती बर्गे, कोकिळा मोरे, शर्वरी मोरे, सरीता बारी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, दीपक साखरे, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, जिल्हा सह प्रसिद्धिप्रमुख धिरज वर्मा, आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, राहुल वाघ, निलेश झोपे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्लावरून कडक इशारा, नेमकं काय घडलं?

Ben Stokes चा नाईटक्लबमध्ये पुन्हा राडा! लॉर्ड्सच्या विजयानंतर कसोटी कर्णधारपदही धोक्यात; इंग्लंड कठोर शिक्षा देण्याच्या तयारीत

Dadar BEST bus accident ब्रेक फेल झाला, जे शक्य होतं ते केलं; बेस्ट चालकाचा दावा, गुन्हा दाखल

Hinjawadi Traffic: आयटी पार्क परिसराला दिलासा! हिंजवडीत चार नवीन जोड रस्ते विकसित होणार, प्रवास होणार सुसह्य

'धनंजय माने इथेच राहतात का?' हा डायलॉग सचिन पिळगावकरांना सुचलेला, एका मुलाखतीत सांगितलेला अशी ही बनवाबनवीचा किस्सा

SCROLL FOR NEXT