crime
crime

जळगावात महिलेचा निर्घृण खून;अनैतिक संबंधातून घडला प्रकार

Jalgaon Crime News : जेवण वाढण्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात खून झाला.
Published on

जळगाव : रामेश्वर कॉलनीतील तुळजामातानगर परिसरात भाजीविक्रेत्या महिलेचा मध्यरात्री एकाने धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) केला. ही घटना शुक्रवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आली. वंदना गोरख पाटील (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. वंदना पाटील भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. रमेश पुंडलिक वंजारी यांच्या घरात १ जून २०२१ पासून भाड्याने राहतात. त्यांचे पती गोरख पाटील यांचे १५ ते २० वर्षांपूर्वीच निधन झाले असून, मुलगा दीपक पत्नीसह लातूर येथे नोकरीनिमित्त राहतो. त्यामुळे वंदना पाटील घरी एकट्याच राहतात.

crime
अमळनेर येथे युवकाचा निर्घृण खून


...असा समजला प्रकार
वंदना पाटील यांचा घराचा दरवाजा सकाळी नऊपर्यंत बंद असल्यामुळे शेजारी राहणारा तरुण कुणाल पाटील याला संशय आला. त्याने दरवाजा ढकलून बघितले असता, वंदना पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
प्राथमिक अंदाजानुसार महिला झोपेत असताना, अज्ञात व्यक्तीने डोक्यात व पोटात धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी पाहणी केली.

संशयिताची कबुली
या प्रकरणी पोलिसांनी सुरेश सुकलाल महाजन (मूळ रा. माळीवाडा, चोपडा, ह. मु. रामेश्‍वर कॉलनी) यास ताब्यात घेतले. सुरेश महाजनने खुनाबाबत कबुली दिली.

डोक्यात, पोटात वार करून फासावर लटकवले
सुरेश महाजनच्या कबुलीनुसार, त्याचे व मृत वंदना पाटील यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वंदनाचा मुलगा दीपक याचे लग्न लावून दिले. यादरम्यान वंदनाचे दुसरीकडेच सूत जुळले. त्याचा सुरेश महाजनला राग होता. तो गुरुवारी रात्री वंदना पाटील यांच्या घरी आला. जेवण वाढण्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सुरेशने वंदनाच्या डोक्यात एक किलोचे वजन मारले. कांदे कापण्याच्या सुरीने तिच्या पोटात वार केले. नंतर तिला दरवाजाच्या भिंतीला फासावर लटकावल्याची कबुली सुरेशने दिली.


crime
VIDEO : रोहित आउट झाला अन् विराट आधी इंग्लिश मॅन बॅटिंगला आला

...असा सापडला संशयित
सुरेश व वंदना यांचे संबंध असल्यामुळे सदरचा गुन्हा सुरेशने केल्याची खात्री करून तो चोपड्यात असल्याबाबत माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांचे पथक चोपडा येथे रवाना केले. चोपडा येथून तीन किलोमीटर अंतरावरील महादेव मंदिर परिसरात लपून बसलेल्या सुरेशला पोलिसमित्र मुख्तार शेख सरदार याच्या मदतीने निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार, राजेंद्र कांडेलकर यांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com