farmer river 
जळगाव

गाडे घेवून बैल पोहतील तर शेतकरी वाचेल

शंकर भामेरे

पहूर (ता.जामनेर) : खडकी आणि देवळन या नद्यांच्या संगमावर असलेल्या जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा गावाचा जांभोळ गावाशी असलेला संपर्क नद्यांना आलेल्या पुरामुळे तुटत आहे. पैलतिरी जाण्यासाठी शेतकरी बैलगाडीवर जातो. पण यात बैलगाडे घेवून बैल पोहतील तरच शेतकरी नदी पार करेल अशी स्‍थिती आहे. यामुळे शेतकरी तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

मागील वर्षापासून जामनेर तालुक्यात चांगला पाऊस होत असल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. चिंचखेडा तवा आणि जांभूळ या दोन गावांमधला संपर्क खडकी आणि देवळन त्यांना आलेल्या पूरामुळे वारंवार तूटत आहे. चिंचखेडा तवा गावातील ७५ टक्‍केपेक्षा अधिक शेतकऱ्यांची शेती नदी पार करून जांभूळ शिवारात आहे.

धान्य काढण्यासाठीच करावी लागतेय कसरत
नदीला आलेल्या पुरामुळे शेतात जाणे शक्य नसल्याने उडीद, मूग, चवळी यासारखे कडधान्य शेतातच खराब होत आहे. हाता -तोंडाशी आलेला घास यामुळे हिरावला जात आहे. तसेच चिंचखेडा तवा येथील आदीवासी बांधवांची शेती नदीच्या पलीकडे असल्याने त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी खतांची मात्रा देता येत नसल्याने तसेच फवारणी करता येत नसल्याने कपाशी पिकाचेही नुकसान होत आहे.

केव्हाही घडू शकते दुर्घटना
जांभूळ ते चिंचखेडा तवा केवळ तीन किलोमिटर अंतर आहे. मात्र पुरामुळे या दोघा गावातील ग्रामस्थांना परस्परांच्या गावी जाण्यासाठी तोंडापूर मार्गे २५ किलोमीटर अंतर असून पहुर मार्गे २८ किलोमीटर अंतर आहे. या नदीवर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून बैलगाडीद्वारे प्रवास करावा लागत आहे. दोघा नद्यांच्या संगमामुळे पाण्याची पातळी केव्हा वाढेल हे सांगता येत नाही. त्यामुळे नदीतून प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्यच असते. यामुळे शेतकऱ्यांसह प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे फत्तेपूर -तोंडापूर गटाचे प्रमुख गोपाळ भोंबे पाटील यांनी केली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT