Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news esakal
जळगाव

Jalgaon Municipal Commissioner : महापालिका आयुक्त घेणार प्रत्येक दिवशी कामाचा आढावा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipal Commissioner : शहरातील विविध भागांतील कामाची गती वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त आता प्रत्येक दिवशी विभागनिहाय कामांचा आढावा घेणार आहेत.

त्यासाठी त्यांनी प्रत्येक विभागाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. (Municipal commissioner dr gaikwad will review work every day jalgaon news)

सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रत्येक दिवशी एका विभागाचा आढावा घेण्यात येणार आहे. यात होणारी कामे, प्रलंबित कामे, विविध अनुदानाच्या कामांची माहिती घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहात ही बैठक होणार आहे.

सोमवार (ता. ७)पासून हा आढावा घेण्यात येणार आहे. सोमवारी आढावा बैठक होईल. त्यात सर्व विभागप्रमुख उपस्थित राहतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंगळवारी (ता. ८) नगररचना विभागाची बैठक होईल. यात नगररचना सहाय्यक व सर्व अभियंते उपस्थित राहतील. बुधवारी (ता. ९) बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, प्रकल्प विभागाची बैठक होईल.

यात सर्व शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, अधीक्षक, लिपीक उपस्थित राहतील. गुरुवारी (ता. १०) महसूल विभागाच्या उपायुक्तांची बैठक होईल. यात सर्व विभाग अधिकारी, कर अधीक्षक, किरकोळ वसुली अधीक्षक, दिव्यांग, महिला व बालकल्याण अधीक्षक उपस्थित राहतील, तर शुक्रवारी (ता. ११) उपायुक्त आस्थापना विभगााची बैठक होईल. यात अधीक्षक, वरिष्ठ लिपीक व लिपीक उपस्थित राहतील. याच क्रमाने प्रत्येक आठवड्यात बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT