Nationalist Ajit Pawar Sharad Pawar groups face each other in Jalgaon  esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावात राष्ट्रवादी अजित पवार,शरद पवार गट आमने सामने

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर आज जळगावात ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’चे दोन्ही गट आमने सामने आले.त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मात्र शरद पवार गटाने अजित पवारांना शिवीगाळ केल्याचा आरोप करीत अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी रामानंद पोलीसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी ॲड.रवींद्र पाटील,अशोक लाडवंजारी यांच्यासह अन्य दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Nationalist Ajit Pawar Sharad Pawar groups face each other in Jalgaon news)

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटातर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर दुपारी आंदोलन करण्यात आले.

पक्षाच्या कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी घोषणा सुरू केल्या.यावेळी मंगला पाटील, इब्राहिम तडवी, वाल्मीक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार गटाचा जल्लोष

पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याने या गटातर्फेही आकाशवाणी चौकात जल्लोष करण्यात आला. त्यांनी ढोल ताश्‍याच्या गजरात अजित पवार आगे बढो अशा घोषणा दिल्या.

तसेच त्यांनी पेढे वाटप करीत फटाकेही फोडले. यावेळी अजित पवार गटाचे अभिषेक पाटील, मनीष जैन व योगेश देसले,कल्पना पाटील, मीनल पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमने-सामने घोषणा

दोन्ही गट आमने सामने येऊन जोरदार घोषणा देवू लागले. त्यामुळे या ठिकाणी वातावरण तंग झाले होते. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

अजित पवार गट पोलीसात

राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर सामना झाल्यानंतर अजित पवार गटाचे पदाधिकारी रामानंद पोलिस स्टेशनात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार गटाने शिवीगाळ केल्याचा आरोप करीत, तक्रार दाखल करीत असल्याचे सांगण्यात आले.

अभिषेक पाटील यांनी तक्रार दिली असून तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की राष्ट्रवादी कॉग्रेस अजित दादा गटाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत असताना,राष्ट्रवादी कॉंगेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रक्षोभक घोषणा दिल्याने त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यानुसार पोलिसांनी शरद पवार गटाचे जिल्हा महानगराध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील,महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह इतर दोन जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT