जळगाव

Jalgaon Crime News : चाळीसगावातील 4 गुंडांवर हद्दपारीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरात गुंडगिरी करुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या चार गुंडांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुंडगिरीला आळा बसणार आहे. (On 4 gangsters Deportation proceedings for two years in chalisgaon jalgaon crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भूपेश ऊर्फ भुप्या यशवंत सोनवणे (वय २३, रा. भडगाव रोड, आर. के. लॉन्सजवळ), अभय उर्फ अभ्या हिंमत लोहार (१९, रा. प्लॉट एरिया), धनंजय उर्फ धन्या बाळासाहेब भोसले (२५, रा. स्वामी समर्थनगर), चोंग्या उर्फ तुषार महेंद्र जाधव (२६, रा. नारायणवाडी पेट्रोल पंपाजवळ) या चौघांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात विविध १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हे चारही जण टोळीने राहून शहरात ठिकठिकाणी दहशत पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करायचे. या चौघा गुंडांपासून नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला होता. शहरात शांतता ठेवण्यासंदर्भात या चारही जणांवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नव्हती.

त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार, हेड कॉन्स्टेबल विनोद भोई, पोलिस नाईक तुकाराम चव्हाण, चतरसिंग महेर, सबा शेख यांनी तयार केला. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. पाटील यांनी तो जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला.

या प्रस्तावाची अभयसिंह देशमुख यांच्याकडून चौकशी झाल्यानंतर चारही जणांना वारंवार गुन्हे करण्याची सवय असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानुसार, चौघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शनिवारी (ता. २३) दिले. दरम्यान, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी, यासाठी आणखीन काही गुंड प्रवृत्तीच्या संशयितांवर अशीच कारवाई करण्याचे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur : सख्ख्या भावाकडून अत्याचार, १३ वर्षीय बहीण २६ आठवड्यांची गर्भवती, हायकोर्टाची गर्भपाताला परवानगी

Ranji Trophy Final: जम्मू-काश्‍मीरच्या अजिंक्यपदाची औपचारिकता; पहिल्यावहिल्या रणजी करंडकाचे जेतेपद निश्‍चित

Latest Marathi News Live Update : कुसळंब गोळीबार प्रकरणी तिघांना अटक, पोलिसांनी पाठलाग करत केले जेरबंद

'अनिल कपूरसारखा नवरा नको!' माधुरी दीक्षितने दिलेलं स्पष्ट उत्तर, म्हणालेली... 'आम्ही फक्त...'

पोर्शे कार अपघात प्रकरण, आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

SCROLL FOR NEXT