Jalgaon Crime News esakal
जळगाव

जळगाव : पिस्तुलधारी तरुणाला पोलिसांकडून अटक

रईस शेख

जळगाव : शहरातील हरीविठ्ठलनगर, धनगरवाडा परिसरात गावठी पिस्तूल (Pistol) घेवुन दहशत माजविणाऱ्या तरुणास रामानंदनगर पोलिसांनी अटक (Arrest) केली. त्याच्या जवळून गावठी पिस्तूल जप्त (Seized) करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. (Police arrest youth with pistol Jalgaon Crime news)

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीविठ्ठलनगरातील धनगरवाडा परिसरात एक तरुण विनापरवाना गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेत फिरत असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाळे, संजय सपकाळे, सुशिल चौधरी, जितेंद्र तावडे, सागर देवरे, महिला पोलिस कर्मचारी स्वाती बागे, रवींद्र चौधरी अशांच्या पथकाने रात्री ८.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी प्रवीण विनोद शिंदे (वय २१ रा. धनगरवाडा, हरीविठ्ठलनगर) याला ताब्यात घेतले. त्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याबाबत रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात प्रवीण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya Banerjee Controversy : नगरसेविकेच्या कार्यालयात कंडोमचा खच, मसाज मशीन्स अन् गुप्त मेकअप रूम; आतील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kartik Joshi : कार्तिक जोशीची कारगिल ते कन्याकुमारी ऐतिहासिक धाव, महाराष्ट्रात आगमन

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

Vaibhav Sooryavanshi ला मॅच सोडून "घरी जा" असं का म्हटलं? इंडिया अ च्या सामन्यात अचानक का वाढला तणाव; जाणून घ्या काय घडलं

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT