Nashik : गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामास वेग

Ganpati making by artist
Ganpati making by artistesakal

जुने नाशिक : गणेशोत्सवाची (Ganeshotsav) चाहूल लागताच गणपती मूर्ती (Ganpati Idol) तयार करण्याच्या कामास वेग आला आहे. विविध लहान- मोठ्या मूर्ती साकारण्याच्या कामात कारागीर मग्न दिसून येत आहेत. यंदा उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (making Ganpati idols started in Nashik city Nashik news)

पुढील महिन्याच्या अर्थात ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी असून, गणेशोत्सवाची सुरवात होणार आहे. गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला नाही. उत्सव साजरा करण्यावर विविध प्रशासकीय बंधने होती. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने बंधने उठविली आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा होणार आहे. भाविकांप्रमाणेच मूर्ती बनविणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे मूर्तिकारांनी मूर्ती तयार करण्यास वेग दिला आहे. एक फुटापासून, तर सहा फुटापर्यंत मूर्ती तयार केल्या जात आहेत. बहुतांशी प्रमाणात मूर्ती तयारही झाल्या आहेत.

त्यांच्या रंगरंगोटीच्या कामात महिला व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. असे असले, तरी मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रंगांच्या दरांमध्ये सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता कारागीरांकडून व्यक्त करण्यात आली. शॅडो मातीच्या दरात सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेहमीच्या विक्रेत्यांकडून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा १५ टक्के अधिक मागणी करण्यात आल्याचेही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. राखी पौर्णिमेपर्यंत मूर्तीचे काम पूर्ण होऊन त्यांची बुकिंग सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.

Ganpati making by artist
Nashik : मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस

"प्रशासन प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असल्याचे सांगत असल्याने विक्रेत्यांमध्ये मूर्ती खरेदीस घेऊन भीती व्यक्त करत आहे. मूर्ती घेऊन दुकान सजवले आणि कारवाई झाली तर काय होणार. अशी भीती त्यांच्या मनात आहे. यंदा दुकानही लावून देतात की नाही. भीती व्यक्त केली जात असल्याने त्याचा परिणाम बुकिंगवर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महागाईमुळे मूर्तींच्या दरांमध्ये सुमारे ३० टक्के वाढ होणे अपेक्षित आहे." -सोनू परदेशी, मूर्तिकार

Ganpati making by artist
प्रभाग 20च्या प्रारूप यादीत 900 मतदारांचा घोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com