Sand tractor  esakal
जळगाव

Jalgaon News: वाळूची चोरटी वाहतूक सुरूच; पोलिसांनी पकडले ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तालुक्यातील सावखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शुक्रवार (ता. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुका पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सावखेडा शिवारातील मराठी शाळेजवळ वाळूची चोरटी वाहतूक करणारे विनाक्रमाकांचे ट्रॅक्टर पकडले.

चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी एक ब्रॉस वाळूसह ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक रामकृष्ण इंगळे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत नितीन किसन कुंभार (रा. पिंप्राळा, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRAN-AMERICA WAR REASON : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला का केला? 'या' 5 कारणांमुळे सुरू झालंय भीषण युद्ध, काळीज पिळवटणारे व्हिडिओ

Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

US, Israel war on Iran : इस्त्रायल- इराण युद्धाचा फटका, पुण्यातून दुबईसाठी विमान सेवा २ दिवस राहणार बंद, अनेक प्रवासी अडकले

Chembur Accident: चेंबूर मजूर मृत्यू प्रकरण! विकसकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, महापौरांचे निर्देश

Latest Marathi News Update : हिंगोली शहरात उभी असलेल्या कारने घेतला अचानक पेट

SCROLL FOR NEXT