Jalgaon Crime News Team esakal
जळगाव

जळगाव : लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला

संशयितास कोरोना झाल्याने अटक टळली

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तालुक्यातील खानापूर (khanapur crime news)येथील सेंट्रल बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन शेंडे याच्यावर युवतीवर लैंगिक अत्याचार(Sexual harassment) केल्याच्या गुन्ह्यात त्याचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने(high court) फेटाळल्याने तो सोमवारी येथील पोलिस ठाण्यात अटक करून घेण्यासाठी शरण आला. मात्र नंतर पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह(covid positive) आढळल्याने पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी सोडून दिले आहे.

खानापूर सेंट्रल बँकेचा(khanapur central bank manager nitin shende) तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन शेंडे याने तालुक्यातील एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून येथील पोलिस ठाण्यात ऑगस्ट २०२१ मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात(high court) धाव घेतली होती. मात्र त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात(Pre-arrest bail denied) आला आणि तो सोमवारी दुपारी येथील पोलिस ठाण्यात शरण आला.वैद्यकीय तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह(corona positive) आढळल्यानंतर पोलिसांनी त्यास लेखी समज दिली असून, कोरोनाच्या उपचारानंतर पुन्हा पोलिसांच्या ताब्यात येण्याबाबतचे पत्र दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT