जळगाव

Jalgaon Crime News: कारागृहातून रजेवर सुटलेला कैदी फरार; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शिक्षाप्राप्त कैद्यांना मिळणाऱ्या २१ दिवसांची संचित रजा संपल्यानंतरही तांबापुरातील रहिवासी कैदी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कारागृहात हजर न राहता फरार झाला आहे. (prisoner on leave from prison is absconding jalgaon crime news)

गुप्त माहितीवरुन रविवारी (ता.१७) रात्री साडेबारा वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानाशा वहाब शेख उर्फ गुड्डू (वय-३५, रा. तांबापुरा, जळगाव) असे फरार बंदीचे नाव आहे.

एका गंभीर गुन्ह्यात बंदी कानाशा वहाब शेख हा छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना कारागृह महानिरीक्षकांनी विनंतीवरुन त्यास (२१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर) दरम्यान २१ दिवसांची संचित रजा मंजूर केली होती.

रजेचा कालावधी उलटूनही न्यायालयीन बंदी गुड्डू हा मध्यवर्ती कारागृहात हजर झाला नाही. परिणामी कारागृह शिपाई महेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन मध्यरात्री १२:३० वाजता भादवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक नितीन पाटील करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT