Road Construction esakal
जळगाव

Jalgaon News: शिवाजी नगरातील रस्त्याचे काम सोमवारपासून करणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: शिवाजी नगरातील लाकूड पेठ ते साळुंखे चौकापर्यंत रस्त्याची कामाची सुरवात सोमवार (ता.२७) पासून करण्यात येणार आहे. शिवाजी नगरातील लाकुडपेठ टी. टी. साळुंखे चौकापर्यंतचे रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यापूर्वी महापालिका फंडातून करण्यात आले.

रस्त्यावर खडीकरण करण्यात आले होते. (Road work in Shivaji Nagar will be done from Monday jalgaon news)

त्यावर डांबरीकरण करावयाचे बाकी होते. मात्र ते लवकर करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खडीही निघाली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली होती.

मध्यंतरी मक्तेदाराच्या डांबराचा प्लँट बंद असल्याने काम थांबले होते, अशी माहिती महापालिका बांधकाम विभागातर्फे देण्यात आली होती. शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी सांगितले, की मक्तेदाराचा डांबराचा प्लँट आता सुरू करण्यात आलेला आहे.

त्याला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याच्याकडे दुसऱ्या एका रस्त्याचे काम आहे, ते लवकरच पूर्ण करण्यात येत आहे. त्यानंतर सोमवार (ता.२७) पासून या शिवाजी नगरातील रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT