bank robbery sakal
जळगाव

जळगाव : भुसावळला बँकेवर दरोड्याचा प्रयत्न

बँकेची भिंत फोडली; मिलिटरी बटालियन परिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरातील झेडटीसी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या(Bank of Baroda) शाखेत दरोड्याचा(bank robbery) अयशस्वी प्रयत्न झाला. ही घटना सोमवारी (ता. ७) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ही बँक मिलिट्री बटालियनच्या परिसरात आहे. याठिकाणी कडेकोट बंदोबस्त असतानाही बँकेची भिंत फोडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील (bhusaval city)झेडटीसी परिसरात मिलिटरी बटालियन कॅम्प आहे. त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा शाखा असून, मिलिटरी जवानांसह परिसरातील नागरिकांना येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अज्ञात चोरट्याने बँकेतील स्ट्रॉंग रूममधील समोरील भिंतीला मागील बाजूला असलेल्या शौचालयमध्ये येऊन भिंतीला भगदाड पडले आहे. या मार्गाने बँकेत प्रवेश करून स्ट्राँगरूममधील स्टॉपसेफला असलेले चॅनल गेटचे कुलूप अर्धवट कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास कर्मचारी बँकेत आले असता ही घटना उघडकीस आली आहे.

अपर पोलिस अधीक्षकांकडून पाहणी

बँकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात भुसावळ शहर पोलिस(bhusaval police station) ठाण्यात माहिती दिली असता येथील पथकाने जाऊन पाहणी केली. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी(Upper Superintendent of police ), उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी बँकेत जाऊन तेथील पाहणी केली. याबाबत भूषण येवलकर यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध(robbery crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT