crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : बहिणीच्या नावे मुखत्यारपत्र करत औद्योगिक भूखंड विक्री; भावासह वहिनीविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : शहरातील रामबाग कॉलनीतील रहिवासी गृहिणीसह तिच्या नणंदेच्या नावे औद्योगिक वसाहत परिसरात सामाईक भूखंड होता. नणंद-भावजयीच्या नावावरील भूखंडाचे खोटे मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) करून परस्पर दोघांनी विक्री केली.

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन संशयितांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Sale of industrial plot by power of attorney in favor of sister jalgaon fraud crime news)

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाजवळ मंजुदेवी लिच्छीराम छाजेड (वय ५७) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत.

मंजुदेवी आणि त्यांची वहिनी मंजुदेवी अशोककुमार बुच्‍चा यांच्या नावाने औद्योगिक वसाहत परिसरातील एम-सेक्टरमधील भूखंड क्रमांक २११ ही दीड हजार चौरस मीटर जागा आहे.

दरम्यान, वहिनी आणि भाऊ अशोककुमार मोतीलाल बुच्चा (दोघे रा. गंधर्व कॉलनी, जळगाव) यांनी संगनमताने ‘पॉवर ऑफ अटर्नी'चे बनावट दस्तावेज तयार करून भूखंड सुहास विश्‍वनाथ मुळे व अमोल विश्‍वनाथ मुळे यांना परस्पर विक्री केल्याचे मंजुदेवी छाजेड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

त्यांनी बुधवारी (ता.६) रात्री नऊला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दस्तऐवज सादर करून भाऊ आणि वहिनीविरुद्ध तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करत आहेत.()

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT