schools in rural area starting sakal
जळगाव

जळगाव ग्रामीण भागात शाळा सुरू : महापालिका क्षेत्रातील शाळा बंदच

पालिका, महापालिका क्षेत्रातील शाळा बंदच ः शाळांत पुन्हा किलबिलाट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील पालिका, महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सोमवार (ता. २४) पासून फक्त ग्रामीण भागातील वर्ग सुरू होतील. पालिका, नगर परिषद, महापालिका क्षेत्रातील वर्ग मात्र सुरू होणार नाहीत. या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात वर्ग सुरू करताना नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे पुन्हा शाळेची घंटा वाजणार असून, जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे.(School open in rural areas of Jalgaon)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून सोमवार (ता.२४)पासून सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

लसीकरण पूर्ण करा

शाळा सुरू करताना पूर्ण काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण केलेले असावे. विद्यार्थ्यांनी वयोगटानुसार आवश्यक लशींचे डोस घ्यावेत, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था आणि शाळांनी नियमांचे तंतोतंत पालन करून वर्ग सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

आकडे बोलतात...

असे आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी

  • पहिली ते पाचवी- तीन लाख ७५ हजार ४६१

  • सहावी ते आठवी- दोन लाख ३३ हजार २३५

  • नववी ते दहावी- एक लाख ४८ हजार ४६७

  • अकरावी ते बारावी- एक लाख ३ हजार ६०४

अशी आहे नियमावली

  • ज्या गावात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहापेक्षा कमी असेल, तरच शाळा सुरू कराव्यात

  • स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, गॅदरिंग, सामूहिक विद्यार्थी नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

  • शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या बाबतीत १५ ते १७ वयोगटातील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण आठ दिवसांच्या आत करावे

  • शाळेतील सर्वांनी १०० टक्के मास्क वापरणे बंधनकारक

  • सभा-संमेलने शिक्षण परिषदा ऑनलाइन घ्याव्यात

  • विद्यार्थ्यांचे परिपाठ, प्रार्थना वर्गातच शारीरिक अंतर राखून घ्याव्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT