Nanded Alcohol News | ‘दारू’ला रस्त्यातूनच फुटले पाय ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Alcohol broke through the road

नांदेड : ‘दारू’ला रस्त्यातूनच फुटले पाय !

देगलूर : धर्माबाद येथील विदेशी मद्य तयार करणारी पायोनियर कंपनीचे जवळपास अकराशे पेटी विदेशी दारू धर्माबाद येथून वाहनाद्वारे कोल्हापूरला निघाली, मात्र वाटेतच त्या कंटेनरला अपघात होऊन त्यातील बहुतांशी माल गायब झाला याप्रकरणी तपासाची चक्रे फिरली असता यामध्ये मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता दिसून येत असून सध्या वीस लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला असून यातील तपासासाठी सहा जणांना अटक करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक ए.एम. पठाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: कोल्हापूर : इचलकरंजीतही पंचगंगेत मृत मासे

धर्माबाद येथील पायोनियर कंपनीत मेकडॉल नंबर एक, बॅग पायपर हे व असे विदेशी मद्य तयार केले जाते. विदेशी मद्याच्या अकराशे पेटी घेऊन चालक अनिल महादेव हिमगिरे ट्रक क्रमांक (टि.एस.१८-५६२३) ता.१७ जानेवारी रोजी धर्माबादहून लातूर तुळजापूर मार्गे कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले मात्र वाटेतच कंटेनरला तुळजापूर जवळ अपघात झाला. मात्र त्यातील बहुतांशी माल गायब झाल्याने याचा संशय कंपनी व राज्य उत्पादन शुल्क खात्याला आला. याप्रकरणी तुळजापूर पोलिस स्थानकात व हटा पोलिस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हा अपघात बनावट असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस व राज्य उत्पादन शुल्क खाते येत असून या पुढील तपासात सत्य बाहेर येईल असे यातील सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: बापाकडूनच मुलगी गरोदर, पळून गेल्याचा बनाव फसला

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे यांनी स्वतः या प्रकरणाच्या तपासाची सुत्रे हाती घेऊन तपास करत असतानाच (ता.२२) जानेवारीला यामधील अनेक कंगोरे हाती लागले. यातील काही माल विक्री करत असताना पकडला गेला तो माल पायोनियरचाच असल्याची खात्री झाल्यानंतर तपासात बरीच माहिती हाती लागली. या अपघातातील १८० पेटी विदेशी दारू ट्रक चालक आनिल हिमगिरे यांच्याकडे त्यांच्या मूळ गावी एकलारा ता. मुखेड येथे तर काही देगलूर येथून हस्तगत करण्यात आली.

तर ८२ पेटी माल तमलूर येथील शेख इर्शाद यांच्याकडे मिळून आला. या सर्व मालाची किंमत जवळपास वीस लाख रुपये होत असून उर्वरित ६० लाख रुपये मालाची रिकवरीसाठी या अपघाताचा सर्व बाजूने तपास सुरू असून यामध्ये आंतरराज्य टोळी तर कार्यरत नाही काय? या दृष्टीनेही तपास करण्यात येत आहे. या साखळीतील अजून चार ते पाच आरोपींना अटक करावयाची असून त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल असे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक ए.एम. पठाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: Nanded Alcohol Broke Through The Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top